Uncategorized

शिवसेनेच्या शाखाप्रमुखासारखं काम केलं तर विजय आपलाच!- शरद पवार

जळगाव | शिवसेनेच्या शाखाप्रमुखासारखे काम करा, म्हणजे विजय आपलाच आहे, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या पदाधीकारी कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

शिवसेना शाखाप्रमुख नागरिकांचे प्रश्न सोडवितो. तेव्हा शिवसेनेचा उमेदवार जिंकतो. तुम्हीही नागरिकांना मदत करा, त्यांच्या अडचणी जाणून घ्या. तेव्हा विजय हा तुमचाच आहे, असं शरद पवार कार्यकर्त्यांना म्हणाले आहेत.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी प्रत्येक जिल्ह्यात, गावात शाखाप्रमुख नेमला. हा शाखाप्रमुख दररोज सायंकाळी सहानंतर कार्यालयात बसून नागरिकांचे प्रश्न सोडवतो. त्यामुळे आपणही कार्यालयात बसून जनतेचे प्रश्व सोडवायला हवेत, म्हणजे आपला विजय नक्की आहे, असं पवार म्हणाले आहेत.

पवारांनी मेळाव्यात बोलतात कार्यकर्त्यांना सवाल केला होता की, तुम्ही कितीवेळ कार्यालयात बसता? आत्तापर्यंत किती लोकांचे प्रश्व तुम्ही सोडवले आहेत? या प्रश्वावर कार्यकर्ते निरुत्तर झाले. त्यावेळी पवारांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या.

महत्वाच्या बातम्या-

-हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक लावून दाखवा; फडणवीसांचं ठाकरे सरकारला आव्हान.

-भाजप ही हारलेली नाही तर जिंकलेली टीम आहे- देवेंद्र फडणवीस

-“इंदुरीकर बोलले त्यात चुकीचं काय?; कारवाई केली तर त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू”

-“आपण कुठल्याही पक्षाचे असा…आता आपण सारे जण दिल्लीचे 2 कोटी लोक माझे कुटुंबीय आहात”

-कै.आर.आर.(आबा) पाटलांच्या नावाने सरकार देणार ‘हा’ पुरस्कार!