सरकारने पीक कर्जाचे पुढचे 4 ते 5 वर्षसाठी हप्ते पाडून द्यावेत- शरद पवार

मुंबई |  कोरोनामुळे बळीराजा चांगलाच अडचणीत सापडला आहे. सध्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे. त्यामुळे सरकारने त्यांना 4 ते 5 वर्षाचे हप्ते पाडून द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे.

शरद पवार यांनी आज फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. त्यावेळी कमेंट बॉक्समध्ये येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिलीत. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर आपलं नतं मांडली.

कोरोनामुळे बळीराजाची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट अशी झाली आहे. पीक कर्जाची परतफेड शक्य नाही. शेतकऱ्यांना धान्य मोफत देत असताना त्यांच्या धान्याची खरेदी करण्याचा विचारही सरकारने करावा, अशीही मागणी पवारांनी यावेळी बोलताना केली.

दरम्यान, परिस्थिती बदलतेय लोक सहकार्य करतायत हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी सुद्धा सामंजस्याने वागावं. अत्यावश्यक सेवेच्या गाडयांना अडवू नये, अशी सूचना शरद पवार यांनी यावेळी पोलिसांना केली.

महत्वाच्या बातम्या –

-‘कोरोनाचं संकट अत्यंत गंभीर आहे, अर्थव्यवस्थेवर याचा दीडवर्ष परिणाम होणार”

-हीच ती वेळ, देवस्थानांनीही आपली दानपेटी समाजासाठी खुली करावी- रोहित पवार

-फक्त लॉकडाऊन करून चालणार नाही तर…; रघुराम राजन यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला

-कोल्हापूरमध्येही कोरोनाचा शिरकाव; राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 130 वर

-कोरोनाविरुद्धचा लढा जिंकल्यानंतरच भीम जयंती साजरी करू- रामदास आठवले