मागची 5 वर्ष शरद पवार उपाशी असल्यासारखे बसले होते- चंद्रकांत पाटील

मुंबई | शिवसेनेचं हे ठरलं होत की काहीही करून मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा बनवायचा. कितीही जागा कमी आल्या तरी पहिला मुख्यमंत्री त्यांचाच असेल हे त्याचं ठरलं होतं आणि भाजपला दूर करायचं ठरलं होतं, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बोलताना अनेक गोष्टी स्पष्ट केल्या.

भाजपकडून नाही मिळालं दुसरं कुणीतरी. आणि दुसरं कोण तर शरद पवार. ते बसलेच होते. 5 वर्षे उपाशी बसल्यासारखं, असं म्हणत पाटलांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

आपल्याकडं दोन प्रकारची व्होट बँक आहे. एक हिंदुत्ववादी आणि दुसरी धर्मनिरपेक्ष. मुस्लिमांना आरक्षण द्या, म्हणणारी धर्मनिरपेक्ष व्होट बँक. यात कोण येतं, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस. त्यात आम्ही घुसू शकत नाही मात्र आता शिवसेना त्यात घुसू शकेल, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शरद पवार तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले. या तीन टर्ममध्ये त्यांनी 40 पैकी 38 गोष्टी पूर्ण केल्या होत्या, असं प्रमोद महाजन यांनी मला सांगितलं होत, असंही पाटील म्हणाले. पाटलांनी या मुलाखतीत राजकीय वर्तुळाला धक्के देणारे खुलासे करत प्रकाश टाकला.

महत्वाच्या बातम्या-

-“अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद स्टॅम्प पेपरवर लिहून द्या तरच चर्चेला या”

-“शरद पवारांनंतर आता अजित पवारांवर देखील पीएचडी करण्याची इच्छा”

-कोरोबाबत पुण्यात अफवा पसरवण्यावर गुन्हा दाखल

“शरद पवारांनी तीन टर्ममध्ये 40 पैकी 38 गोष्टी पूर्ण केल्या”

-मल्हारराव होळकरांच्या जयंतीनिमित्त राम शिंदेंकडून झाली ही मोठी चूक