Loading...
महाराष्ट्र मुंबई

शरद पवारांनी सांगितलेला ‘तो’ किस्सा एैकताच उपस्थितांमध्ये हशा पिकला

मुंबई | विधान परिषदेचे आमदार कपिल पाटील यांच्या शिक्षक भारती संघटनेने आयोजित केलेल्या शिक्षकांच्या अधिवेशनात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आपल्या किशोर वयातील आणि सामाजिक आणि राजकीर्दीतले निवडक किस्से सांगितले. आपल्या भाषणात त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांनाही मिश्किल टोले लगावले.

शरद कमळ बघ, छगन कमळ बघ असा धडा बदलणाऱ्यांना मला सांगायचं आहे की माझ्यावर लहानपणापासून कमळ बघण्याचे संस्कार झालेले नाहीत. माझा जन्म झाला त्यावेळी 7 दिवसांचा असताना मी आईच्या काखोटीतून स्कुल बोर्डाच्या मिटींगला गेलोय. त्यामुळे मला कमळ कसं दिसेल?, हा किस्सा सांगताच उपस्थितांमतध्ये हास्याचे कारंजे उडाले.

Loading...

ज्या काळात आम्ही एकत्र काम करत नव्हतो तेव्हा मी रोज सकाळी सामना वाचायचो. आज काय फटकारे लगावलं, आज काय टोला लगावला, आज काय चिमटा काढलाय हे पाहण्यासाठी मी सामना वाचायचो. त्यावेळी वाटायचं की यांना असं रोज कसं सुचतं? ते आत्ता कळलं की त्यांच्या पत्नी शिक्षिका आहे. त्या रोज जाब विचारत असतील, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मागील सरकारने काळजी घेतली नाही. त्यामुळे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्या दिसत आहेत. महाराष्ट्रात 13 हजार शाळा बंद होतात. इतका उध्वस्त करणारा चुकीचा निर्णय आजपर्यंत कुणी घेतला नव्हता, असं म्हणत पवारांनी फडणवीस सरकरावर टीकेचे ताशेरे ओढले.

 

महत्वाच्या बातम्या- 

-छ. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात लालसी सरकारने आमच्या भगिनींची सुरक्षा वाऱ्यावर सोडली- चंद्रकांत पाटील

-उद्धवजी, शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्यावरच कळेल किती आक्रोश आहे- राजू शेट्टी

-“शरद पवार सिर्फ नामही काफी है. महाराष्ट्राचा हा नेता जेव्हा दिल्लीत उभा राहतो तेव्हा दिल्लीलाही झुकावं लागतं”

Loading...

-चितळे उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा काकासाहेब चितळे काळाच्या पडद्याआड

-कसाबला फासावर पोहोचवणाऱ्या उज्ज्वल निकम यांच्यावर बायोपिक

Loading...