Loading...
पुणे

शरद पवारांनी तरुणाला विमानातून दाखवला चाकण अन् मगरपट्टा; मराठवाड्याच्या तरूणाला झालं आभाळ ठेंगणं

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सहज उपलब्ध होणारे आणि सर्वांशी संवाद साधणारे म्हणून ओळखले जातात. तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत आणि सर्वसामान्य मानसाशीही शरद पवार संवाद साधत असतात. असाच अनुभव दिल्ली ते पुणे असा विमानाने प्रवास करणाऱ्या परभणीच्या एका तरुणाला आला आहे.

दिल्ली ते पुणे प्रवासादरम्यान या तरुणाच्या शेजारच्या सीटवर शरद पवार बसले होते. यावेळी शरद पवारांनी या तरुणाशी दिलखुलास गप्पा मारल्या. तसेच तरुणाला विमानातून चाकणचा भाग दाखवला. तेथील उद्योगधंद्यांची माहिती दिले. शेतकरीच या उद्योगधंद्यांचा मालक असल्याचं पवार तरुणाला सांगत आहेत.

Loading...

तरुणाशी संवाद साधत असल्याचा शरद पवारांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे.

विमानात तरुणाशी संवाद साधणारा आदरणीय पवार साहेबांचा व्हिडीओ पाहिला. साहेब म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठच ! या विद्यापीठातून कोणीच रिकाम्या हाताने जात नाही. समाजातील प्रत्येक घटकाशी संवाद साधत विचारांची देवाणघेवाण करणारा त्यांचा हा स्वभाव आम्हा सर्वांसाठीच आदर्श आहे!, असं पाटील म्हणाले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

-… म्हणून संभाजी भिडेंना अटक होण्याची शक्यता

-“अंगाऱ्या धुपाऱ्याने मंत्री झालेल्या पाटलांचं पद दोन चार महिन्यात जाणार”

-कर्जमाफीच्या हिशेबात बँकांचा घोळ; मंत्री बच्चू कडू यांचा धक्कादायक अहवाल

Loading...

-कोर्टात जाताना हिंगणघाटच्या आरोपीने केली ‘ही’ इच्छा व्यक्त!

-शालिनीताईंचा अजित पवारांशी पंगा; तात्काळ सत्तेवरून हटवण्याची राज्यपालांकडे मागणी

Loading...