Loading...
महाराष्ट्र

मनसेनं कधीही हिंदुत्व सोडलेलं नव्हतं- शर्मिला ठाकरे

मुंबई | पाकिस्तान, बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांना बाहेर काढण्यात यावं या मागणीसाठी मनसेनं मोर्चा काढला आहे. या मोर्चापूर्वी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच आम्ही कधीही हिंदुत्व सोडलेलं नव्हतं, असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आजच्या मोर्चासंदर्भात जे काही बोलायचं विषय मांडायचे आहेत ते पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे मांडतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कधीही भूमिका बदलली नाही, असं शर्मीला ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

Loading...

आम्ही कधीही हिंदुत्व सोडलं नव्हतं. रझा अकादमीनं केलेल्या हल्ल्यानंतर राज ठाकरे यांनी मोर्चा काढला होता, असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलंय.

दरम्यान, मनसेच्या जुन्या झेंड्यातही भगवा होता. भगवा हा छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकऱ्यांचा आहे, असं शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या- 

-राज ठाकरेंनी हिंदुत्ववादाचा वसा घेतल्यामुळे शिवसेना अस्वस्थ- प्रवीण दरेकर

-“मनसेच्या मोर्चामागे भाजपचाच हात”

-राज ठाकरेंवरील प्रेमापोटी दिव्यांग आजोबांनी नगरहून थेट गाठली मुंबई!

-“उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावर बसण्याचा अधिकार नाही”

-“थोड्या दिवसांनी अजित पवारच शिवसेना चालवताना दिसतील”

Loading...