‘पूजा चव्हाण आत्मह.त्या प्रकरणात ‘हा’ शिवसॆना मंत्री’; चित्रा वाघ यांचा धक्कादायक आ.रोप !

पुणेे | पु्ण्यातील तरूणी पूजा चव्हाण आत्मह.त्या प्रकरणावरूण राजकीय वर्तुऴात चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणामागे महाविकास आघाडीतील एका मंत्र्य़ाचा हात असल्याचा आ.रोप सातत्याने विरोधी पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे. परंतु हा मंत्री नेमका कोण याचा उलगडा होत नव्हता. मात्र, आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीतील त्या मंत्र्य़ाच्या नावाचा उलगडा केला आहे.

भाजपने शिवसेना मंत्री संजय राठोड यांच नाव घेत या प्रकरणामागे त्यांचाच हात असल्याचा आ.रोप केला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी यासंबंधीत एक ट्वीट केलं आहे. तसेच संजय राठोड यांच्यावर मनुष्यव.धाचा गु.न्हा दाखल करण्याची मागणी देखील चित्रा वाघ यांनी केला आहे.

चित्रा वाघ ट्वीट करत म्हणाल्या की, पूजा चव्हाण घटनेत समोर आलेले सगळे अपडेट पाहता याचा थेट रोख शिवसेना मंत्री संजय राठोडांकडे जातो. पोलिसांनी स्यु-मोटोंतर्गत त.क्रार दाखल करत मंत्री संजय राठोडवर सदोष मनुष्यव.धाचा गु.न्हा दाखल करावा. मुख्यमंत्रीजी एव्हढे पुरावे असतानाही मु.सक्या आवळायच्या सोडून कसली वाट पहाताय?

या ट्वीट सोबत चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये त्यांनी महाविकास आघाडील नेत्यांवर अनेक गंभीर आ.रोप केले आहेत. तसेच पो.लीस याबाबत स्पष्टता का देत नाहीत असा सवाल देखील चित्रा वाघ यांनी व्हिडीओमध्ये विचारला आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण टीक टॉकमुऴे प्रकाशझोतात आली होती. ती मूऴ बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील होती. पुणेे येथे ती वानवडी भागात इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी आली होती.

८ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाणने इमारतीतून उडी घेऊन आत्मह.त्या केली. प्रथमदर्शनी तिने त.णावातूऩ आत्मह.त्या केल्याचं बोललं जात होतं. मात्र, या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आणि राजकीय वर्तुऴात एकंच खळबळ उडाली.

पूजा चव्हाण या तरूणीच्या आत्मह.त्या प्रकरणावरूण आता संजय राठोड यांच्या भोवती सं.शयाची सुई निर्माण झाली आहे. वि.रोधी पक्षातील नेते या प्रकरणावरूण चांगलेच आ.क्रमक झाले आहेत. या प्रकरणी आता पुढे काय होतंय, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

ऐकावं ते नवलच! मला नवऱ्याकडे जायचंय म्हणत चिमुरडी ढसाढसा रडली, पहा व्हिडिओ

‘माझी बहिण वाघिण होती पण…’; पूजा चव्हाणच्या बहिणीची भावूक पोस्ट व्हायरल

धक्कादायक ! ‘या’ कारणामुळे त्याने सांडपाण्याच्या नळीत लपवलं 21 लाखांचे सोनं!

पूजा चव्हाण प्रकरण: मुसक्या आवळायच्या तर वाट कसली बघताय?- चित्रा वाघ

जाणून घ्या शरीरासाठी गुणकारी असणाऱ्या काळ्या तांदळाविषयी, ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे