खळबळजनक! महिलेचा ‘या’ शिवसेना खासदारावर बलात्काराचा आरोप

मुंबई | शिवसेनेच्या बड्या नेत्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या प्रकरणात पीडित महिलेने लेखी तक्रारही दाखल केली आहे

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार देण्यात आली आहे.

या प्रकरणी अद्याप पोलिसांनी एफआयआर दाखल केलेला नाहीये. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती समोर येत आहे.

त्या महिलेची ही तक्रार संपूर्णपणे निराधार आहे. माझी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रतिमा मलिन करणअयाच्या उद्देशाने हेतुपुरस्कर तक्रार करण्यात आली आहे असं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.

माझ्याविरोधात केलेल्या बोगस तक्रारीमागे कोण आहे याचाही पर्दाफाश लवकरच करेन असंही खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.

महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी हेतुपुरस्कर हा आरोप करण्यात आला असल्याचं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“तुम्हाला कळत नसेल तर अजित पवारांना विचारा…”; चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना टोला 

“…मग केंद्र सरकार काय फक्त घंटा वाजवायला बसलंय का?” 

सचिन पायलट यांच्या इशाऱ्याने राजस्थानमध्ये खळबळ; काँग्रेसचं टेंशन वाढलं 

Pune | पुणेकरांना झटका देणारी बातमी समोर; सीएनजीच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ 

पुणेकरांना झटका, सीएनजीच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ