छत्रपती शिवरायांचा पुतळा पुन्हा जागेवर बसवा, अन्यथा… आक्रमक शिवप्रेमींचा इशारा

मुंबई | महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बेळगाव मधील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आला आहे. या घटनेमुळे कर्नाटकसह महाराष्ट्रातील शिवभक्त प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. सर्वत्र या घटनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत.

शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवल्याने महाराष्ट्रातील शिवभक्त कर्नाटकात जाऊन आंदोलन करण्याच्या तयारीत दिसत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत शिवभक्त रस्त्यावर उतरले आहेत.

मनगुत्ती गावातील मुख्य चौकातही महिला आणि नागरिकांनी एकत्र येऊन घटनेचा विरोध केला आहे. त्याबरोबरच, कर्नाटक मधील भाजप सरकारचा निषेधही केला आहे.

महाराष्ट्र राज्यात कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, सोलापूर, जालना, नांदेड अशा अनेक जिल्ह्यातील शिवभक्त आक्रमक झाले आहेत. अहमदनगरमध्ये कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला बांगड्यांचा हार घालत तो पुतळा दहन करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“जेव्हा जेव्हा देश भावुक झाला, तेव्हा तेव्हा महत्त्वाच्या फाईल्स गायब झाल्या”

मृत कोरोनाग्रस्ताला कुटुंबाने वाऱ्यावर सोडलं; तृतीयपंथियांसह-नागरिकांनी घालून दिला आदर्श

दिशा सॅलियन आणि सुशांतचं नातं काय?; मुंबई पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

तुझ्या शरीराचं ते अंग दाखव; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीकडे झाली होती मागणी

पत्नीनं मारहाण केल्याचा आरोप; चक्क पोलिसानंच पोलीस ठाण्यात दिली तक्रार