केजरीवाल सरकारचं ‘दिल्ली मॉडेल’ इतर राज्यांत राबवा; शिवसेनेचा मोदींना सल्ला

मुंबई | केजरीवाल सरकारच्या कार्याचा आदर्श घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळाने ‘दिल्ली मॉडेल’ इतर राज्यांत राबवायला हरकत नव्हती व त्या कामी केजरीवाल यांच्या ‘व्हिजन’चा वापर देशभर करायला हवा, असं म्हणत शिवसेनेनं सामना अग्रलेखातून अरविंद केजरीवाल यांची स्तुती तर भाजपला चिमटे काढले आहेत.

दिल्लीत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. 8 फेब्रुवारी रोजी या राज्यात मतदान होणार आहे. दिल्लीत आप, भाजप आणि काँग्रेस समोरासमोर आहेत. मात्र, खरी लढत भाजप आणि आपमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं सामनातून भाष्य केलं आहे.

केजरीवाल यांच्या भूमिका, त्यांच्या कार्यपद्धतीविषयी मतभेद असू शकतात, पण हाती मर्यादित सत्ता असताना, केंद्राने वारंवार अडथळे आणूनही आरोग्य, शिक्षण, नागरी सुविधा याबाबतीत त्यांच्या सरकारचे काम आदर्श आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

दरम्यान, दिल्लीत काँग्रेसचे अस्तित्व फारसे उरलेले नाही. भाजप सुकलेल्या तलावात कमळ फुलवीत आहे. त्यांच्या या नव्या फुलोत्पादनता शुभेच्छा, असं म्हणत शिवसेनेनं टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आम्ही कधी एकमेकांवर कंबरेखालचे वार केले नाहीत; आव्हाडांचे भाजपवर टीकास्त्र

-मुख्यमंत्रीसाहेब, प्रथम स्वत:च्या अंगणातील घुसखोरांना हाकला; शिवसेनेला मनसेचं जाहीर आव्हान

-मुख्यमंत्रीसाहेब, प्रथम स्वत:च्या अंगणातील घुसखोरांना हाकला; शिवसेनेला मनसेचं जाहीर आव्हान

-खळबळजनक! सांगलीत आठवड्याभरात 2 राष्ट्रवादी नेत्यांच्या हत्या

-“एक केजरीवाल सगळ्यांना भारी पडतायत; मागच्या पाच वर्षात त्यांनी केलेल्या कामांवर मतं मागितली”