शिवेंद्रराजेंनी घेतली शरद पवार, अजित पवारांची भेट; साताऱ्यात चर्चांना उधाण!

सातारा | भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मात्र या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नसल्याचं कळतंय.

शरद पवार आणि अजित पवार हे आज सातारा दौऱ्यावर आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भात ते साताऱ्यात आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांची शिवेंद्रराजे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेट घेतली आहे.

शिवेंद्रराजेंनी मतदारसंघातील प्रलंबित समस्या संदर्भात दोन्ही नेत्यांशी संवाद साधला. जिल्हा बँक, एमआयडीसी, वैद्यकीय महाविद्यालय आणि प्रलंबित समस्या संदर्भात निवेदन दिल्याची माहिती आहे.

सातारा एमआयडीसीतील बजाजचा महाराष्ट्र स्कूटरचा उद्योग सुरु करावा, चाळीस एकर जमीन त्यांच्या ताब्यात आहे. सर्वात जास्त जमीन ही बजाजकडे आहे. लोकांना कारखाने उभे करण्यास जागा नाही. त्यामुळे त्यांनी तिथे काहीतरी करावी नाहीतर जागा एमआडीसीकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी शिवेंद्रराजेंनी अजित पवारांकडे केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यभरात….; उर्जामंत्र्याचे स्पष्ट निर्देश

-ठाणे जिल्ह्यात कोरोना धुमाकूळ… मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

-पुणे जिल्ह्यासाठी राजेश टोपे यांचा ‘हा’ कठोर निर्णय! मुंबई शहरातही ‘नवा’ आदेश

-काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा, हा बडा नेता पुन्हा दिल्लीत!

-सलग 21 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचा भडका; आजचा दर जाणून घ्या…