“पुढच्या 48 तासात शिवराज सिंह सत्ता स्थापनेचा दावा करतील”

दिल्ली| मध्यप्रदेशमध्ये कमलनाथ सरकारच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेतली आहे. यामुळे सिंधिया भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया यांना समर्थन करणारे काँग्रेसमधील बंडखोर आमदार विधानसभा अध्यक्षांना आपला राजीनामा पाठवण्याची शक्यता आहे. यामुळे 48 तासात कमलनाथ सरकार अल्पमतात येईल. आणि यानंतर शिवराज सिंह चौहान सत्तास्थापनेचा दावा करतील, असेही भाजपने सांगितले आहे.

सर्वांचे फोन स्वीच ऑफ आहेत आणि ते कुठे आहेत याची अधिकृत माहिती अद्याप दिली गेलेली नाही. हे सर्व आमदार आणि मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक असल्याचं बोललं जात आहे.

कर्नाटक नंतर आता मध्यप्रदेशमध्ये सत्तेचं नाट्य रंगलं आहे. कमलनाथ सरकारच्या तब्बल 22 मंत्र्यांनी राजीनामे दिले आहे. एकाचवेळी 22 मंत्र्यांनी राजीनामे दिल्यामुळे काँग्रेस अडचणीत सापडलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अजितदादांनी केलं रोहित पवाराचं तोंडभरून कौतुक; म्हणाले…

-…अन् तरूणाने जयंत पाटलांसमोर केला पत्नीला व्हिडीओ कॉल

-“पुणेकरांनो घाबरू नका, कोरोनाचा सामना करायला आपली आरोग्य यंत्रणा सज्ज आहे”

-अजित दादा तुम्हीच मुख्यमंत्री आहात; चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला

-काँग्रेसला मोठं खिंडार; ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर