Loading...
देश

दिल्लीत भाजपचा पराभव… शिवसेनेची सडकून टीका तर ‘आप’वर स्तुतीसुमनं!

मुंबई | दिल्ली विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट व्हायला हळूहळू सुरूवात झाली आहे. सुरूवातीपासूनच अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपने जोरदार मुसंडी मारली आहे. दिल्लीच्या 70 जागांपैकी आप 50 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. यावर शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांनी आपचं कौतुक करताना भाजपवर जोरदार टीका केली आहे.

आम्हीच राज्य करू… आमच्याशिवाय दुसरं कुणीच राज्य करू शकत नाही या अहंकाराचा दिल्लीकरांनी पराभव केला आहे, अशी टीका परब यांनी भाजपवर केली आहे. तर दिल्लीने विकासाला साथ दिल्याचंही त्यांनी म्हटलं.

Loading...

दिल्लीकरांनी भाजपचा अहंकार उतरवला. त्याचबरोबर महाराष्ट्र सत्तास्थापनेचा प्रभाव दिल्लीच्या निकालावर दिसून आल्याचंही मत परब यांनी व्यक्त केलं आहे. तसंच दिल्लीकरांनी मोदी शहांना नाकारलं अशी टीकाही परब यांनी केली आहे.

लोकांना विकास हवा असतो. इकडचे तिकडचे मुद्दे नको असतात. दिल्लीच्या लोकांनी विकासाला डोळ्यासमोर ठेऊनच मतदान केलं, असं ते म्हणाले. तर दिल्लीकर नागरिकांनी देशद्रोही भाजपला नाकारल्याची बोचरी टीका राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-दिल्लीत पैसा हरला… केजरीवालांचा विकास जिंकला- नवाब मलिक

-दिल्लीत ‘आप’ची जोरदार आघाडी; पाहा कोण किती जागांवर आघाडीवर

-दिल्लीमध्ये काहीही होऊ…. मी जबाबदार- मनोज तिवारी

Loading...