उद्धव ठाकरेंसह शिवसेनेकडून विधानपरिषदेचा दुसरा उमेदवारही निश्चित

मुंबई | विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना विधान परिषदेचं तिकीट जाहीर करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषद आमदारकीचा अर्ज भरण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांची लगबग सुरु आहे. मुंबई, ठाणे, रायगड या मतदारसंघातील शिवसेनेच्या आमदारांच्या उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारी अर्जावर सह्या झाल्या आहेत.

11 मेच्या आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे. विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी राज्यात 21 मे रोजी निवडणूक होणार आहे. प्रत्येक सदस्याला जिंकण्यासाठी 29 मते हवी आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने अटी-शर्तींसह परवानगी दिली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची आवश्यक ती काळजी घेऊन निवडणूक घेण्याची सूचना आयोगाने केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘मजुरांना विनामूल्य रेल्वेसेवा द्या’; रितेश देशमुखनं शेअर केला मन सुन्न करणारा फोटो

-‘नैतिकतेच्या मुद्द्यावर तुम्ही इतिहासजमा झाला आहात’; आशिष शेलारांची शिवसेनेवर टीका

-पिठाच्या पिशव्यांमधून गरिबांना खरंच 15 हजार रुपये वाटले का?; आमिर खाननं स्वतः केला खुलासा

-“भारतात कोरोनाचा संसर्ग लवकरच आटोक्यात येईल”

-मजुरांच्या घरी जाण्याच्या प्रवासाचा खर्च काँग्रेस करणार; सोनिया गांधींची मोठी घोषणा