जुन्या खोंडांना नकार; शिवसेनेची पहिली पसंती प्रियांका चतुर्वेदी!

मुंबई  | शिवसेनेने राज्यसभेसाठी काँग्रेसमधून आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी मंत्री दिवाकर रावते यांची नावंही राज्यसभेसाठी चर्चेत होती, मात्र जुन्या निष्ठावंतांना डावलून नव्याने शिवसेनेनेत दाखल झालेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना उमेदवारी देणं शिवसेनेनं पसंत केलं आहे.

राज्यसभेच्या खासदारकीसाठी आज शिवसेना उमेदवाराची घोषणा होणार असल्यानं सगळ्यांचं या नावाकडे लक्ष लागलं होतं. सेना आपल्या जुन्या शिलेदारांना संधी देणार की पक्षात नव्याने आलेल्या चतुर्वेदींवर विश्वास टाकणार?, असा प्रश्न सर्वांना पडला होता.

प्रियांका चतुर्वेदी या पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. चतुर्वेदींनी थेट त्यांच्याकडेच ‘फील्डिंग’ लावल्याची चर्चा होती, त्यामुळे राज्यसभेच्या या जागेसाठीच्या शर्यतीत त्याच सर्वात पुढे होत्या.

दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, अनंत गिते यांची नावेही राज्यसभेसाठी चर्चेत होती. मात्र या सर्वांच्या पदरी निराशाच पडली आहे.

महत्वाच्या बातम्या –

-विधानसभेनंतर राज्यसभेचंही तिकीट नाही; त्यावर नाथाभाऊ म्हणतात…

ज्यांच्या नावाची चर्चा त्यांचा पत्ता कट… भाजपने दिली तिसऱ्यालाच उमेदवारी

सुपरस्टार रजनीकांत राजकारणाच्या आखाड्यात; करणार नवीन पक्षाची स्थापना

-राहुल गांधींनी पदरी पडलेल्या संधीचे वाटोळे केले; संघाचे टिकास्त्र

-स्टेट बॅंकेने घेतले तीन मोठे निर्णय; SBI मध्ये खातं असेल तर नक्की वाचा