शहरातून गावाकडे पळणाऱ्यांना संजय राऊत यांचा सोप्या शब्दात खास सल्ला!

मुंबई | कोरोना विषाणूने सध्या सर्व जगभरात दहशत पसरवली आहे. राज्यात संचारबंदी लागू झाली आहे. कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव शहरी भागात आहे. त्यामुळे शहरवासी आपल्या गावाकडे पळ काढू लागले आहेत. यांनाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करून खास संदेश दिला आहे.

आपण जिथेही असाल… जसंही असाल तिथे आपण खूश रहा. आपल्याला भेटण्याची सध्या तरी आवश्यकता नाही. आपल्याला भेटण्याची नाही तर आपण कायम आमच्यासोबत रहावं ही जरूरी आहे, असं सूचक आणि चिमटा काढणारं ट्विट करत गावाकडे जाणाऱ्यांना राऊत यांनी खास संदेश दिला आहे.

कोरोना व्हायरसने सगळेच जण धास्तावले आहेत. सगळ्यांनीच गावाकडची वाट धरली आहे. शहरात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त आढळून यायला लागले आहेत. नोकरीनिमित्ताने तसंच शिक्षणानिमित्ताने अनेक तरूण शहरात आहेत. हेच तरूण आता गावाकडे जाऊ लागले आहेत.

दरम्यान, कोरोनाचं संसर्ग अधिक फैलवू नये यासाठी राज्य शासनाने गंभीर पावलं उचलली आहेत. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण राज्यात संचारबंदीची घोषणा केली आहे. तसंच जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही.

 

महत्वाच्या बातम्या-

-‘कोरोना रोखण्यासाठी भारताने घेतलेले निर्णय योग्यच’; WHO कडून भारताचं कौतुक

-26 मार्चला होणारी राज्यसभेची निवडणूक आयोगाने पुढे ढकलली

-पंतप्रधान मोदी आज रात्री 8 वाजता पुन्हा संबोधित करणार; काय घोषणा करणार??

-कोरोनाग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी दिलं तीन महिन्यांचं वेतन

-महाराष्ट्रातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याने कोरोनाविरोधातील लढाई जिंकली