Top news महाराष्ट्र मुंबई

‘ज्या नवऱ्यात ताकद असते तो दोन काय चार बायका सांभाळू शकतो’; राम शिंदेच्या टीकेला ‘या’ खासदाराचं प्रत्युत्तर!

अहमदनगर | महाविकास आघाडी सरकार म्हणजे एक नवरा दोन बायका, अशी खरमरीत टीका भाजप नेते राम शिंदे यांनी महाविकास आघाडीवर केली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिंदेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

ज्या नवऱ्यात ताकद असते तो दोन काय चार बायका सांभाळू शकतो, असे आमचे नेते असल्याचं सदाशिव लोखंडे यांनी म्हटलं आहे. त्यासोबकतच त्यांनी राज्य सरकारला एक मागणी केली आहे.

दुधाचे शेतकरी व्याकूळ झाले आहे. त्यांना पैसे मिळत नाही ही खरी गोष्ट आहे. मात्र दुधाच्या पदार्थांना देखील भाव मिळत नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने सबसिडी दिली पाहिजे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी लोखंडे यांनी केली आहे.

दरम्यान, भाजपच्या राम शिंदेनी केलेल्या टीकेवर अजूनही महाविकास आघाडीतील कोणत्याही नेत्याची प्रतिक्रिया आलेली अद्याप समजू शकलेली नाही. मात्र प्रत्युत्तर येण्याची दाट शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

सुशांतच्या आत्महत्येच्या रात्री सुशांतसोबत असणाऱ्या मित्राने सांगितली ‘त्या’ रात्रीची कहानी; म्हणाला…

…त्यामुळे सदाभाऊ पिसाळल्यासारखं करत आहेत; राजू शेट्टींचं जोरदार प्रत्युत्तर!

‘राजू शेट्टी म्हणजे गावात सोडलेला वळू’; सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली

आनंदची यशोगाथा! ज्या इयत्तेत झाला होता नापास त्याच इयत्तेच्या पाठ्यपुस्तकात आज त्याचा धडा

जन्मदात्याचं ‘ते’ वाक्य जिव्हारी लागल्याने आठवीत शिकणाऱ्या मुलीने संपवलं आपलं आयुष्य!