Top news महाराष्ट्र मुंबई

…तर मुंबईतून केंद्र सरकारला जाणारा सगळा कर रोखू; शिवसेना खासदाराचा केंद्र सरकारला इशारा

मुंबई | आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र मुंबईहून गुजरातला हलवलं तर मुंबईतून केंद्र सरकारला जाणारा कर रोखू, असा इशारा शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी दिला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

केंद्र सरकारने मुंबईच्या आकसापोटी आणि गुजरातवरील प्रेमापोटी मूळ निर्णयात फेरफार करून ‘आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र’ गांधीनगर, गुजरात येथे हलवण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. गांधीनगरवर केंद्र सरकारचं एवढंच प्रेम असेल तर त्यांनी एकट्या मुंबईकडून केंद्राला मिळणारा ४० टक्के म्हणजे जवळपास पावणे दोन लाख कोटी रुपयांचा करही गांधीनगरमधूनच वसूल करावा, असं त्यांनी म्हटलंय.

आयएफएससी मुंबईबाहेर नेले तर केंद्र सरकारला या अन्यायकारक निर्णयाची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही राहुल शेवाळे यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

दरम्यान, मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरातला हलवण्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्रात संतापाचं वातावरण आहे. काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये यावरुन जुंपली आहे, त्यात शिवसेनेने भाजपवर जोरदार टीका सुरु केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-“फडणवीस, महाराष्ट्राची बाजू घेण्याऐवजी गुजरातची वकिली करत आहेत हे क्लेशदायक”

-…तर ते या राज्यात राहण्याच्या लायकीचे नाहीत, असंच म्हणावं लागेल- संजय राऊत

-त्यांनी तयार केलेलं ‘सोशल’ औषध आता त्यांनाच ‘कडू’ लागतायत; राष्ट्रवादीचा व्यंगचित्रातून भाजपवर निशाना

-लॉकडाउनमध्ये थोडा दिलासा; ‘या’ ठिकाणी बससेवा होणार सुरू

-डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलाची तहसीलदाराला मारहाण, हे आहे खरं कारण…