“…तर मग सगळ्यात अपयशी गुजरात आणि उ.प्रदेश राज्य, अन् त्यांची जबाबदारी मोदी आणि शहांची असेल”

मुंबई |  महाराष्ट्रातले ‘ठाकरे सरकार’ कोरोनाशी लढण्यात अपयशी ठरल्याची घंटागाडी वाजवत महाराष्ट्राचा विरोधी पक्ष पुनः पुन्हा राजभवनाची पायरी चढतो आहे, आंदोलने करतो आहे. अपयशाचे म्हणायचे तर मग कोरोनाच्या बाबतीत सगळय़ात अपयशी राज्य म्हणून उत्तर प्रदेश आणि गुजरातकडे पाहावे लागेल. पंतप्रधान म्हणून मोदी व गृहमंत्री म्हणून अमित शहांची येथे जबाबदारी येतेच, असं मत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या रोखठोकमध्ये व्यक्त केलं आहे.

आपल्या देशातील परिस्थितीही दुर्दैवी आहे. लोक चालत घराकडे निघाले, पण त्यांना घरी जाण्यापासून सरकार रोखून ठेवते ते कोणत्या अधिकारात?, अशी विचारणा करत जे राज्य आपल्याच भूमिपुत्रांना राज्यात येऊ देत नाहीत. एखाद्याला आपल्याच गावात आणि घरी जाण्यापासून रोखणे हे कोणत्या कायद्यात बसते? कोरोनाचे संकट असले तरी एखाद्याला घरी जाण्यापासून रोखणे अमानुष आहे. या अमानुषतेचे दर्शन आता रोजच होत आहे, असं राऊत म्हणाले आहेत.

जगाचे सगळेच संदर्भ आता बदलले आहेत. आपल्या देशातील परिस्थितीही दुर्दैवी आहे. लोक चालत घराकडे निघाले, पण त्यांना घरी जाण्यापासून सरकार रोखून ठेवते ते कोणत्या अधिकारात? हिटलरने ज्यूंचा छळ केला, मग हा छळ काय कमी आहे? देशातील सर्वच राजकारण्यांना एकत्र करून अंध गायक के. सी. डे यांचे गाणे त्यांना ऐकवायला हवे… ‘बाबा, मन की आँखे खोल…!’ , असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

वर्क फ्रॉम होम म्हणजे घरातूनच काम करावे आणि सुरक्षित राहावे हा विचार वाढतो आहे. घरातून काम करणाऱयांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होईल असा इशारा ‘मायक्रोसॉफ्ट’चे सत्या नाडेला यांनी दिला आहे. तो खरा मानला तर ‘कोरोना’ काळात राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला हे जाणवू लागले आहे, असा टोल त्यांनी महाराष्ट्र भाजपला लगावला.

महत्वाच्या बातम्या-

-खासगी रूग्णालयांना आरोग्यमंत्री राजेश टोपेंची कळकळीची विनंती

-“हे जर असंच सुरू राहिलं तर कामगार कपातीप्रमाणे मंत्रीकपात करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येईल”

-PMPML च्या 2100 कर्मचाऱ्यांना गेल्या महिन्याचा पगार नाही

-राज्यात विमानसेवा सुरू होणार का?, गृहमंत्री अनिल देशमुख यांचं मोठं वक्तव्य

-राज्यात 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचा विचार; शिक्षणमंत्र्यांचे संकेत