“1999 साली झालेल्या कारगील युद्धात मला लढायचं होतं, मला गुरांचा चारा खावा लागला तरी चालेल पण…”

इस्लामाबाद | पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर आपल्या गचाळ वाणीमुळे नेहमी चर्चेत असतो. कारण त्याची वक्तव्यच तशा प्राकराची असतात. आता मागे त्याने आपला माजी क्रिकेटर फलंदाज वीरेंद्र सेहवागला मारलं असत, असं म्हटलं त्यामुळे त्याला भारतीय चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी त्याला चांगलच टीका करत झोडपलं. अशातच त्याने पुन्हा आता पाकिस्तान सरकारला आर्थिक बजेटमध्ये सैन्यासाठी जास्त पैशांची तरतूद करण्याबाबत एक वक्तव्य केलं आहे.

जर मला परमेश्वराने अधिकार दिले तर मी आर्थिक बजेटमध्ये पाकिस्तानी सैन्यासाठी जास्त पैशांची तरतूद करेन. त्यासाठी मला गुरांचा चारा खावा लागला तरी चालेल, असं शोएबनं म्हटलं आहे.

मी देशासाठी गोळी खायला तयार होतो. 1999 साली झालेल्या कारगील युद्धात मला लढायचं होतं त्यामुळेच मी त्यावर्षी काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी नकार दिला होता, असं शोएब अख्तरने सांगितलं.

दरम्यान, मी आर्मी चीफला माझ्यासोबत बसवून निर्णय घ्यायला सांगेन. जर पाकिस्तानी सैन्यासाठी आर्थिक बजेट 20 टक्के तरकूद असेल तर मी 60 टक्के करेन. जर आपण एकमेकांचा आदर करणार नाही तर आपलंच नुकसान असल्याचं अख्तरनं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

20 लाख का आँकडा पार, गायब है मोदी सरकार; राहुल गांधींचं मोदींवर टीकास्त्र

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आता निर्णय घ्यायला शिकावं”

चीनला झटका, भारतानंतर अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घालणाऱ्या आदेशावर ट्रम्प यांची स्वाक्षरी

काही विघ्नसंतोषी राजकारण्यांच्या पोटदुखीस अंत नाही- संजय राऊत

महानायक अमिताभ यांनी लेखकाची मागितली माफी; मी चुकलो..