क्राईम

धक्कादायक! पत्नीसह नातेवाईकावर कोयत्याने सपासप वार करत दोघांना संपवलं

दौंड| दौंड तालुक्यातील खुटबाव येथील मटकाळा हद्दीत, घरी आलेल्या नातेवाईकासह पत्नीवर कोयत्याने सपासप वार करत त्यांची हत्त्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री पोलिसांनी आरोपीला अटक करत दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत.

खुटबाव गावच्या हद्दीत असलेल्या नवा मुठा उजवा कालव्यानजीक एक आदिवासी कुटुंब आपल्या पालामध्ये राहत होतं. गुरुवारी रात्री एक पाहुणा यांच्या घरी मुक्कामी आला होता. रात्री त्यांच्यात कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. त्यामुळे राग अनावर झाल्याने आरोपीने पत्नीसह पाहुण्यावर बांबूने तसेच कोयत्याने सपासप वार केले. त्यामुळे पाहुणा व पत्नी जागीच मृत्यू पावले.

पोलिसांना याविषयी खबर मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतलं आहे. तसेच दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी नजीकच्या रुग्णालयात पाठवून दिले आहेत.

दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे. यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील पुढील तपास करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

संतापजनक! पुन्हा एकदा महिला आरोग्य कर्मचाऱ्यासोबत घडला संतापजनक प्रकार

कौतूकास्पद! रक्ताच्या नात्यांनी अंत्यसंस्कारासाठी नाकारलं पण माणुसकीच्या नात्याने निभावलं; सरपंचाने घातला अनोखा आदर्श

औरंगाबादमध्ये हृदयद्रावक घटना! तीन सख्ख्या भावांसह पाच जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

धक्कादायक! कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने एसटी कर्मचाऱ्याने उचललं ‘हे’ मोठं पाऊल!

ठाकरे सरकारचं स्टिअरिंग नेमकं कोणाच्या हातात?; उद्धव ठाकरे म्हणाले