संतापजनक! निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती; शारीरिक सबंध ठेवायला विरोध केल्याने 12 वर्षीय मुलीच्या गुप्तांगात….

नवी दिल्ली | कोरोनाकाळात देशात स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. देशाची राजधानी असणाऱ्या नवी दिल्लीमध्ये अशीच माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. बलात्काराला विरोध केल्याने अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगात कात्री भोकसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्लीतील पश्चिम विहारमधील पीरा गरही परिसरात गुरुवारी ही घटना घडली आहे.

12 वर्षीय अल्पवयीन मुलगी गुरुवारी घरात एकटी होती. एक नराधम यावेळी अचानक चोरीच्या उद्देशाने घरामध्ये शिरला. मात्र, मुलगी घरात एकटी दिसल्याने त्यानं तिच्यावर बलात्कार करायचा प्रयत्न केला. मुलीनं जेव्हा बलात्काराला विरोध केला तेव्हा नराधमानं तिच्या गुप्तांगात अनेक वेळा कात्री भोकसली.

मुलीच्या गुप्तांगाला आणि आतड्यांना गंभीर इजा झाली आहे. त्याबरोबरच मुलीच्या डोक्यालाही जखम झाली आहे. दिल्ली मधील एम्समध्ये मुलीवर सध्या उपचार चालू असून मुलीची प्रकृती अतिशय गंभीर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्यावेळी आरोपी मद्याधुंद अवस्थेत होता. आरोपीला यापूर्वीही अनेक वेळा अटक करण्यात आली होती. मात्र, जामिनावर तो बाहेर आला होता. पोलिसांनी सध्या आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतलं आहे. समाजाताली अशा नराधमांना फाशीचीच शिक्षा झालीच पाहिजे.

महत्वाच्या बातम्या-

अखेर ठरलं, T-20 विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे, तर स्पर्धा होणार या वर्षी!

तुम्हाला मी खुपतो पण तुमचं पितळ एका दिवशी उघडं करणार; अविनाश जाधव आक्रमक

चांगली बातमी! अवघ्या ‘इतक्या’ रूपयात कोरोनाची लस होणार उपलब्ध!

एअर इंडियाच्या विमानाला केरळमध्ये भीषण अपघात; विमानाचे झाले दोन तुकडे

सुशांत सिंहची हत्या झाली असेल तर मग…; रोहित पवारांनी भाजपला सुनावलं