Top news महाराष्ट्र मुंबई

“ज्या दिवशी शिवसेना काँग्रेस बरोबर सत्तेत बसली त्याच दिवशी हिंदुत्वाला लाथ मारली”

uddhav thackrey e1603855016891

बुलडाणा | भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. शिवसेनेचं (shivsena) हिंदुत्व फक्त आणि फक्त अंगावर चढवण्यापूरतं राहिलं आहे, अशी बोचरी टीका श्वेता महाले यांनी शिवसेनेवर केली आहे.

ज्या दिवशी शिवसेना काँग्रेस (Congress) बरोबर सत्तेत बसली, त्याच दिवशी त्यांनी हिदुत्वाला लाथ मारली, असं श्वेता महाले यांनी म्हटलं आहे. त्या बुलडाण्यात माध्यमांशी बोलत होत्या.

नवाब मलिकांवर मुंबईतील बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपींशी व्यवहार केल्याचे आरोप आहेत. त्यांना वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढे आले आहेत. हे दुर्देवी आहे. शिवसेनेचं हिंदुत्व निघून गेलं आहे. सध्या शिवसेनेचं हिंदुत्व ढोंगीपणाचं आहे, असंही त्या म्हणाले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यामुळे आपण हिंदुत्व सोडलं असं होत नाही. आम्ही अजूनही हिंदुत्ववादी आहोत. आमचं हिंदुत्व कायम आहे. उलट भाजपचं हिंदुत्व ढोंगी आहे. सत्तेसाठी भाजप हिंदुत्वाला विसरली आहे. हिंदुत्ववादी मित्र पक्षांना विसरली आहे, अशी टीका शिवसेनेने वारंवार केली आहे. तर सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्वाला तिलांजली दिल्याची टीका भाजपकडून सेनेवर करण्यात आली आहे.

नवाब मलिक यांनी दाऊदच्या हस्तकांसोबत जमिनीचा व्यवहार केल्यानंतर भाजपने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला अधिकच घेरलं होतं. त्यातच आता श्वेता महाले यांनी शिवसेनेवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘…तोपर्यंत आई-वडीलांच्या मालमत्तेवर मुलांचा हक्क नाही’; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय 

कोरोनाची चौथी लाट येणार?; तज्ज्ञांचा गंभीर इशारा 

“भाजपचेच 50 आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि आहेतच” 

माही दा नंबर सात! धोनीनं सांगितलं आपल्या जर्सी नंबरचं ‘ते’ रहस्य 

 “मी येतोय म्हटल्यावर निवडणुकीत रंग येतो, माझ्या इमेजचा फायदा…”