महाराष्ट्र मुंबई

‘देवदूतां’च्या मदतीला सिद्धिविनायक; लॉकडाऊनमध्ये पोलिसांसाठी जेवणाची सोय

मुंबई | लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या पोलिसांच्या मदतीला ‘सिद्धिविनायक’ धावून आला. श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून पोलिसांना जेवण, पाणी यांची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

लॉकडाऊनच्या काळातही पोलिस आपलं कर्तव्य चोख पार पाडत आहेत. अशावेळी तहानभूक हरपून ते काम करतात. मात्र अन्न पाण्याअभावी त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून देवाने दानपेटी उघडली आहे.

न्यासातर्फे लॉकडाऊनच्या काळात दादर, नायगाव, वरळी भागात कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलिस आणि वाहतूक पोलिसांना जेवण, पाणी सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे.

श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासा’चे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी या कामात पुढाकार घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या – 

-कौतूकास्पद! Parle G कंपनी पुढच्या 3आठवड्यात वाटणार 3 कोटी बिस्किट पुडे

-“ आईशपथ, मी संजय राऊत यांना प्लॅटफॉर्मवर पेटी वाजवताना पाहिलं होतं”

-आरोग्यविभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळणार 4 महिन्यांचा अ‍ॅडव्हान्स पगार

-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतूक मंत्र्यांनी घेतला हा मोठा निर्णय!

-दिलासादायक! पुण्यात 24 तासांत 5 जण कोरोनामुक्त, 48 तासांत एकही नवा रुग्ण नाही