Top news मनोरंजन

‘…म्हणून मी सुशांतच्या अंत्यविधीला गेले नाही’; ट्रोलर्सच्या प्रश्नांवर मौन सोडत अंकिता लोखंडेनं सांगितलं कारण

मुंबई | अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मुत्यूनंतर अनेक नवनविन खुलासे समोर येत आहेत. सुशांतसिंहची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिने सुशांतच्या आत्महत्येनंतर ट्रोलर्सच्या प्रश्नांवर मौन धरलं होतं. मात्र आता तिने हे मौन सोडत अनेक खुलासे केले आहेत.

सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर अंकिता त्याच्या अंत्यविधीलाही हजर नव्हती. या कारणावरून तिला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. अंत्यविधीला न जाण्याचं कारण सांगताना अंकिता म्हणाली, मी सुशांतला कधीच त्या अवस्थेत पाहू शकले नसते. मी त्याला त्या अवस्थेत पाहिलं असतं तर मी कधीच विसरू शकले नसते. त्यामुळे मी त्याच्या अंत्यविधीला न जाण्याचं ठरवलं.

सुशांत डिप्रेशनमध्ये जाणं शक्यच नाही. तो डिप्रेशनमध्ये होता म्हणणारे लोक त्याला किती ओळखतात? मी त्याला ओळखते तो नैराश्यात जाणारा मुलगा नव्हताच. हे मी दाव्यानिशी सांगू शकते, असं अंकितांने म्हटलं आहे. सुशांतसिंहने नैराश्यातून गळफास घेऊन अत्त्महत्या केली असा दावा अनेक जणांनी केला. यावर अंकिताने आपलं मत मांडलं.

पुढे अंकिता असंही म्हणाली, ‘पवित्र रिष्ता ही मालिका सोडल्यानंतर सुशांत तीन वर्षे घरी बसून होता. तो बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करत होता त्याला जर आत्महत्या करायची असती तर त्याने त्यावेळीच केली असती.’

महत्वाच्या बातम्या-

संतापजनक! देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या सीआरपीएफच्या जवानानंच महिलेबरोबर केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात उद्धव ठाकरे काँग्रेस आणि बॉलिवूड माफियांच्या दबावाखाली- उपमुख्यमंत्री

राज्याच्या आरोग्यमंत्र्यांवर दु: खाचा डोंगर; राजेश टोपेंच्या मातोश्रींचं निधन

“आम्ही येतोय रे ठाण्याला कोण अडवतंय बघूया, हे सरकार शिवशाहीचं नाही तर मोघलाईचं आहे”

दडी मारलेला पाऊस करणार दैना; पुढील 4 दिवस ‘या’ भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता