मराठा क्रांती मोर्चाचा चेहरा शांतारामबापू कुंजीर यांचे निधन

पुणे | संभाजी ब्रिगेडचे मुख्य समन्वयक आणि शेतकरी किसान मोर्चा आंदोलनाचे समन्वयक तसेच मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाचा चेहरा असलेल्या शांतारामबापू कुंजीर यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ५५ वर्षांचे होते.

काही दिवसांपूर्वी सर्व्हिकल स्पाईनच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना घरी आणण्यात आलं, मात्र त्रास जाणवू लागल्याने सोमवारी रात्री त्यांना जहाँगीर रुग्णालयात दाखल करावं लागलं, तिथंच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

बहुजन समाजाच्या चळवळीतील एक सामान्य कार्यकर्ता ते झुंजार सेनापती अशी त्यांची ओळख होती. त्यांनी वेगवेगळ्या 20 ठिकाणी नोकरी केली या काळात मराठा महासंघाच्या माध्यमातून सामाजिक कामास सुरुवात केली. 2005 मध्ये ते संभाजी ब्रिगेडमध्ये कार्यरत झाले.

Shantaram Bapu Kunjir 1

मराठा आरक्षणासाठी शिवनेरीवर झालेल्या आंदोलनामध्ये मुख्यमंत्र्याचे हेलिकॉप्टर फोडल्याचा गुन्हा शांताराम बापूंवर होता. विविध संघटनांच्या माध्यमातून समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवून देणे, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे, D.Ed. च्या विद्यार्थ्यांचा स्टायपेंडचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलने, नवोदित लेखकांना संधी उपलब्ध व्हावी यासाठी आत्तापर्यंत दहा पुस्तकांचे प्रकाशन, असं सामाजिक काम बापूंनी केलं आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-परीक्षांबाबत लवकरच निर्णय जाहीर करणार- मंत्री उदय सामंत

-तुकाराम मुंढेंनी शासनाचा आदेशही मानला नाही; दारुची दुकानं बंद म्हणजे बंदच!

-परप्रांतीय मजुरांची पोलिसांवर दगडफेक; परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराचा वापर

-…या दोन मराठमोळ्या मुलींनी आपल्या अदाकारीनं जिंकलं साऱ्या महाराष्ट्राचं मन

-उठवलेली दारूबंदी हे शासनाचं अतर्क्य पाऊल- डॉ. अभय बंग