सुनेला भूतबाधा झाल्याच्या संशयावरून सासरच्या माणसांनी तिच्यासोबत केलं असं काही की…

वडोदरा | गुजरातमधील वडोदरा येथे अत्यंत धक्कादायक आणि तितकाच विचित्र वाटणारा प्रकार घडला आहे. सुनेला भूतबाधा आहे त्यामुळे सासरच्या माणसांनी तिला नवऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवू न देता मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. वडोदरा पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनेच्या शरीरात भूत किंवा आत्म्याची सावली आहे. त्यामुळे तिने जर आपल्या मुलाबरोबर शारीरिक संबध ठेवले तर ते भूत आपल्या मुलाच्या अंगात जाऊ शकते. असं म्हणत सासऱ्याने सुनेला आपल्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवू दिले नाहीत. जेव्हा सुनेने सासऱ्याला याविषयी जाब विचारला तेव्हा तिला सासरच्या माणसांकडून मारहाण करण्यात आली.

फेब्रुवारी 2020 मध्ये या दाम्पत्याचा रजिस्टर पद्धतीने विवाह झाला आहे. लग्न झाल्यापासूनच सासऱ्यानी केव्हाच तिला पतीसोबत शारीरिक संबंध ठेवू दिले नाहीत तसेच घरामध्ये महिलेचा छळही चालूच होता .

सासरच्या माणसांच्या छळाला कंटाळून या महिलेने वडोदरा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. वडोदरा पोलीस स्टेशनमध्ये महिलेने तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

रक्षाबंधन दिवशी बहिणींनी ओवाळले अन् भावाने ओवाळणीत दिले आपले प्राण

माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांबद्दल पोलिसानेच काढले अपशब्द अन् मग…

अमृताजी, पोलीस बांधव तेच आहेत बदललीय ती फक्त तुमची दृष्टी; चाकणकरांचा निशाणा

अमृताजी, पोलीस बांधव तेच आहेत बदललीय ती फक्त तुमची दृष्टी; चाकणकरांचा निशाणा

शिवसेना राम जन्मभूमीत थाटामाटात कार्यक्रम करणार; भूमिपूजनानंतर संजय राऊत गरजले