सोनिया गांधींच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक; शिवसेनेच्या ‘या’ नेत्यांची हजेरी

मुंबई |  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांची एकत्रित बैठक आज पहिल्यांदाच पार पडली. या बैठकीला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत यांनी सहभाग नोंदवला.

कोरोना म्हणजे 21 दिवसांचं युद्ध आहे, असा भ्रम मोदींनी देशासमोर उभा केला. मात्र यातून काहीही साध्य झालं नाही. सरकारकडे लॉकडाऊनमधून बाहेर पडण्याचं कसलंच धोरण नाहीये. काँग्रेससह समविचारी पक्षांनी अशा संकटात गरिबांच्या खात्यात थेट मदतीची मागणी केली आहे. सरकारनं थेट खात्यात पैसे टाकण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं आहे, असे ताशेरे सोनिया गांधी सत्ताधारी मोदी सरकारवर ओढले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या राजकीय पक्षांशी कोरोनाच्या या कठीण काळात सुसंवाद साधयला हवा. संच विरोधी पक्षाचं म्हणणं देखील त्यांनी ऐकायला हव तसंच कोरोनात जास्त गुरफटून न जाता आता रस्ते, विमान आणि रेल्वे वाहतूक हळूहळू सुरु करणं गरजेचं असल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

बैठकीच्या सुरुवातीला विरोधी पक्षाने अम्फान चक्रीवादळात मृत्यू पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली. केंद्र सरकारने अम्फान चक्रीवादळाला तातडीने राष्ट्रीय आपत्ती घोषित करा, तसंच या चक्रीवादळचा फटका ज्या राज्यांना बसला आहे, त्यांना आर्थिक मदत द्या, अशी मागणी केली.

महत्वाच्या बातम्या-

-आजचं आंदोलन भाजपच्या अंगलट?; सोशल मीडियावर #महाराष्ट्रद्रोहीBJP ट्रेंड

-पुण्यातील ‘हा’ भाग नवा कंटेन्मेंट परिसर घोषित; एकाच दिवशी सापडले 19 कोरोनाबाधित रुग्ण

-आम्हाला डोमकावळे म्हणताय, जनता तुम्हाला लबाड लांडगे म्हणते; शेलारांची टीका

-“…तर भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 36 ते 70 लाखांवर गेली असती”

-निधीची गरज लागल्यास मागणी करा, तात्काळ देतो; अजितदादांचा पुणे महापौरांना शब्द