Loading...
Top news देश

कर्जावरील व्याज आकारणी थांबवा, इएमआयवर 6 महिन्यांसाठी बंदी घाला ; सोनिया गांधींनी मोदींना लिहिलं पत्र

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून त्यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनचे समर्थन केले आहे. मोदींना समर्थन जाहीर करताना त्यांनी देशभरातील डॉक्टर्स आणि पॅरामेडीकल स्टाफ यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावलं उचला, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

देशातील उद्योगक्षेत्रासाठी दिलासा देणाऱ्या पॅकेजेसची घोषणा करावी, अशी मागणीही त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. देशातल्या सर्व प्रकारच्या सामानाची पुरवठा साखळी मजबूत करण्यात यावी अशी मागणीही सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. या बरोबरच सरकारने सर्व ईएमआयवर 6 महिन्यांसाठी बंदी घालावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Loading...

देशभरात करोनाचा वाढता संसर्ग सुरू असताना या काळात बँकांनी कर्जावरील व्याज माफ करावे, अशीही त्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचीही मागणी केली. करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज सहा महिन्यांसाठी आकारणे बंद करावे, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे.

करोना विषाणूने देशातील जनतेचे जीवन धोक्यात असून त्याचा देशातील गरीब लोकांवर मोठा परिणाम होणार आहे असे सांगत सोनिया गांधी यांनी संपूर्ण देश एकसंघ होऊन करोनाशी लढण्यासाठी सज्ज झाला असल्याचे म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या – 

-दूध आणण्यासाठी घराबाहेर पडला; पोलिसांच्या दंडुकेशाहीमुळे जीव गमावला

-चंद्रकांत पाटलांचा उपक्रम; कोथरुडमध्ये 5 रुपयात घरपोच पोळी भाजी

-कर्मचारी वर्गाला मोठा दिलासा; मोदी सरकारने केली ही मोठी घोषणा

-बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू मदतीसाठी पुढे सरसावली; केली 5 लाखांची मदत

-“लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी समजला का? जयंतरावांनी मोदींवर केलेली टीका योग्यच”

Loading...