Top news महाराष्ट्र मुंबई

अभिनेता सोनू सूद राज्यपालांच्या भेटीला, वाचा भेठीपाठीमागचं कारण…

मुंबई |  अभिनेता सोनू सूद याने राज्यपाल भगतिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. शनिवारी संध्याकाळी त्याने राज्यपाल महोदयांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. त्याने घेतलेल्या भेटीमुळे अनेकांचे डोळे विस्फारले आहेत.

हजारो विस्थापित आणि परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावाकडे जाण्यासाठी सोनू सूदने आपल्या स्वखर्चाने मदतकार्य सुरू केलं होतं. अनेकांना घरी जाण्यात सोनूने महत्त्वाची भूमिका बजावली. ट्विटरवर त्याला टॅग करून आपली अडचण सांगितली की काही वेळात सोनूचा रिप्लाय येत असे आणि पुढच्या काही वेळात आपल्या घरी जाण्याचा तो बंदोबस्त करत असे, हा गेल्या अनेक दिवसांपासूनचा नित्यक्रम झाला होता. याच पार्श्वभूमीवर राज्यपालांनी त्याची दखल घेतली.

आतापर्यंत केलेली मदत आणि उपाययोजना सोनूने राज्यपाल महोदयांना सांगितल्या. तसंच त्यांना मदतीचा तपशील देत त्यांचे आभार देखील मानले. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने मला हे काम करता आलं, असंही सोनूने आवर्जून राज्यपालांना सांगितलं.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून राजभवन विशेष चर्चेत आहे ते राजकीय नेत्यांच्या भेटीगाठीमुळे.. भाजप नेते सातत्याने राज्यपालांना भेट आहेत. त्यातच मागील काही दिवसांत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी राज्यपालांची भेट घेतली. तसंच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील राज्यपालांची भेट घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर चर्चा केली होती.

महत्वाच्या बातम्या-

-कर्नाटकमध्ये भूकंप होणार?; नाराज भाजप आमदारांची बैठक

-देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रात, पत्रात म्हणतात…

-अक्षय बोऱ्हाडे गुन्हेगारी टोळ्यांशी परिचीत आहे- तृप्ती देसाई

-“कोरोना संकटकाळात नरेंद्र मोदी पंतप्रधान हे भारताचं सुदैव”

-केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्सनूसार काय बंद राहणार, काय उघडणार?