…तो पर्यंत शहीद झालेल्या 20 जवानांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही- अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली | पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चीनने बेकायदरित्या बळकावलेला आपला भूभाग आपण परत मिळवत नाही, तो पर्यंत शहीद झालेल्या 20 जवानांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

चीनवर संपूर्ण देश संतप्त असून सैन्याच्या पाठिशी उभा आहे. संपूर्ण देश केंद्र सरकारचे समर्थन करतोय, असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

काहीही करुन आपल्याला तो भूभाग परत मिळवावा लागेल. 1962 साली सुद्धा भारताने मैत्रीचा हात पुढे केला होता. पण चीनने विश्वासघात केला. मागच्या काही वर्षात भारत-चीन संबंधात परिस्थिती बदलेली नाही, असं केजरीवालांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आपल्याला रणनिती बदलावी लागेल. आपण मैत्रीचा हात पुढे करत असलो तरी आपल्याला सतर्क रहावे लागेल. ते पुन्हा फसवणूक करु शकतात, असंही अरविंद केजरीवाल यांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

-“पेंग्विनच्या अंड्यातून बाहेर आलेला कोण आहे हा वरुण सरदेसाई?”

-आरोग्य विभागामार्फत प्लाझ्मा संकलनासाठी…., राजेश टोपेंची घोषणा

-भिडे गुरूजी, लवकरच ठणठणीत बरा होऊन हा पैलवान आपले आशीर्वाद घेण्यास येईल- महेश लांडगे

-“परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाही”

-काँग्रेसमध्ये ना सभ्यता आहे ना संस्कार आहेत- साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर