इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक, राज्यभरात आंदोलन सुरु

मुंबई | काँग्रेसने मोदी सरकार विरोधात ‘स्पीक अप इंडिया’ हे आंदोलनसुरु केलं आहे. राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, अमरावती अशा ठिकाणी काँग्रेसचं आंदोलन झालं. सोशल मीडियावरही काँग्रेसने इंधन दरवाढीचा निषेध केलाय.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात पुण्यात सहभागी झाले होते. वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारु मेहंगा पेट्रोल, असा फलक हाती घेत त्यांनी नारेबाजी केली आहे.

साताऱ्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनात विश्वजित कदम यांच्यासह जिल्हयातील काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर सोलापूरमध्ये काँग्रेस भवनासमोर केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

दरम्यान, काँग्रेसने मोदी सरकार विरोधात देशव्यापी आंदोलन केलंय. राजधानी दिल्लीपासून मुंबई, पुणे, सातारा, अमरावतीत आंदोलन करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-विरोधकांनी लक्षात ठेवावं, आमचं सरकार पाच वर्षे टिकणारच- बाळासाहेब थोरात

-…तेव्हा गप्प का?, पडळकरांवरुन राष्ट्रवादी राजकारण करत आहे- देवेंद्र फडणवीस

-सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी आता ‘या’ अभिनेत्रीची चौकशी होणार

-शोएबला भारतात असलेली त्याची पत्नी सानियाला भेटायचं आहे पण…

-राज्यात जून महिन्यात आतापर्यंत जवळपास 29 लाख थाळ्यांचं वाटप, भुजबळांची माहिती