संपूर्ण राज्यात संचारबंदी, प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा बंद!; राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई |  कोरोना विषाणूचा संसर्ग आणि वाढणारा फैलाव लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संचारबंदी घोषित केली आहे. तसंच एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास बंदी घातलेली आहे.

जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य तसंच इतर आवश्यक सेवा सुरु राहतील. मात्र ते वगळून पूर्ण संचारबंदी असेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

खाजगी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. फक्त गरज असेल तरच चालक अधिक दोन जण, रिक्षामध्ये चालक अधिक एक जण प्रवास करायला परवानगी दिलेली आहे.

दरम्यान, कालच्या कर्फ्यूनंतर लोकांनी आज पुन्हा एकदा गर्दी करायला सुरूवात केली होती. त्यानंतर आज राज्य शासनाला संचारबंदीचं पावलं उचलणं गरजेचं ठरलं. आता 31 मार्चपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

“मला पोलीस सुरक्षा नको, आत्ताच्या घडीला महाराष्ट्राला त्यांची जास्त गरज आहे”

-कोरोनाला हरवण्यासाठी नागरिकांनी घरीच थांबावं म्हणून शरद पवारांनी दिला हा संदेश

-“सरकार गंभीर होगी तो जनता गंभीर होगी”

-“पाकिस्तानमध्ये आम्ही लॉकडाउन करु शकत नाही”

-#Corona | लालबाग गणेश मंडळ पुढे सरसावलं; रक्तदान शिबिराचं केलं आयोजन