महाराष्ट्र पुणे

“विधानसभेला राम शिंदेना निवडून आणण्याची जबाबदारी माझी”

Ram shinde

अहमदनगर : राम शिंदेना आमागी विधानसभेला निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे, असं अहमदनगरचे खासदार सुजय विखेंनी म्हटलं आहे. ते जामखेडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. 

राम शिंदे यांनी नगरचे पालकमंत्री म्हणून कितीतरी पटीने चांगलं काम केलं आहे. ते फक्त प्रसिद्धीला कमी पडत आहे, असं सांगत राम शिंदेच्या विजयासाठी झटणार असल्याची ग्वाही सुजय विखेंनी दिली आहे.

राम शिंदेनींच सर्वात जास्त निधी कर्जत-जामखेडमध्ये आणला आहे. तरीही मला मोठी आघाडी मिळाली नाही याचं मला कायम कोडं वाटतं. यामध्ये जनतेचा दोष नसून राम शिंदे प्रसिद्धीला कमी पडले असल्याचं दिसून आलंय, असं सुजय विखे म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू रोहित पवार जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात आहे. यामुळे राम शिंदेंना निवडून आणण्याची जबाबदारी विखेंनी घेतल्याने आता जामखेडमध्ये रोहित पवार विरूद्ध सुजय विखे असा सामना रंगणार असल्याचं दिसत आहे.

काहीजण निवडणूक जवळ आल्याने गोरगरीबांसाठी अपक्रम राबवतात मात्र त्याचा काही उपयोग होणार नाही, असा टोमणा ही अप्रत्यक्षपणे सुजय विखेंनी रोहित पवारांना लगावला आहे.