“केजरीवालांचा पराभव होणार, असं झालं नाही तर…”

नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली असून 11 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या विविध एक्झिट पोलनुसार निवडणुकीत आपचा विजय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, भाजप नेते सुनिल यादव यांनी वेगळं भाकीत व्यक्त केलं आहे.

केजरीवाल यांचा पराभव होणार आहे आणि भाजपचा विजय निश्चित आहे. जर असं झालं नाही तर मी पुन्हा कधीच निवडणूक लढवणार नाही. आयुष्यभर फक्त संघटनेचं काम करत राहिन, भारत माता की जय, असं यादव म्हणाले आहेत. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

दिल्लीत विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून भाजपनं सुनिल यादव यांना उमेदवारी दिली होती. याबद्दल यादव यांनी पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि पक्षाचे आभार मानले आहेत.

दरम्यान, एक्झिट पोलचा अंदाच खोटा ठरवत भाजप दिल्लीत बाजी मारतं का? हे पाहावं लागेल.

महत्वाच्या बातम्या-

-उद्योजकांना त्रास देणाऱ्यांना मोक्का लावा- अजित पवार

-मनसेनं कधीही हिंदुत्व सोडलेलं नव्हतं- शर्मिला ठाकरे

-राज ठाकरेंनी हिंदुत्ववादाचा वसा घेतल्यामुळे शिवसेना अस्वस्थ- प्रवीण दरेकर

-“मनसेच्या मोर्चामागे भाजपचाच हात”

-राज ठाकरेंवरील प्रेमापोटी दिव्यांग आजोबांनी नगरहून थेट गाठली मुंबई!