किर्तनकारांबद्दल माझ्या मनात नेहमी सन्मानच पण,…- सुप्रिया सुळे

अहमदनगर | प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकरांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात चांगलेच अडकले आहेत. अनेकांनी या वादावर भाष्य केलं आहे. एकीकडे त्यांना पाठिंबा दिला जातोय तर दुसरीकडे त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. यातच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

किर्तनकारांबद्दल माझ्या मनात नेहमी सन्मानच आहे. माझी श्रद्धा आहे पण अंधश्रद्धा नाही. पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात अशी अंधश्रद्धा पसरवली जाणं अत्यंत दुर्दैवी आहे, असं सुप्रिया सुळेंनी इंदुरीकरांच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे.

आम्ही यशवंतराव चव्हाणांच्या, नरेंद्र दाभोळकरांच्या संस्कारात वाढलोय. पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात अशी अंधश्रद्धा पसरवणं दुर्दैवीच असल्याचं परखड मत सुळेंनी मांडलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात वाढते महिला अत्याचार हा सामाजिक प्रश्न आहे. फक्त कायदे कडक करुन हा प्रश्न सुटणार नाही. समाजात प्रबोधन करण्याची गरज आहे. घरगुती अत्याचार का घडत आहेत याचा विचार करण्याची गरज असल्याचंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या-

-तरूणाईला ठाकरे सरकारचा दिलासा; 8 हजार पोलिस तर 7 हजार सिक्युरिटी गार्डच्या होणार भरत्या!

-भाजपच्या अधिवेशनात मानापमान नाट्य; अखेर खडसेंना पहिल्या रांगेत बसण्याची संधी

-निवडणूक संपलीये, झालं गेलं विसरा… दिल्लीचे 2 कोटी नागरिक माझे कुटुंबीय- केजरीवाल

-दिल्लीच्या रामलीला मैदानावर केजरीवालांचं काळजाला हात घालणारं भावूक भाषण!