मनोरंजन

सुशांतच्या जवळच्या बॉडीगार्डचा धक्कादायक खुलासा; सुशांत बेशुद्ध अवस्थेत असायचा तेव्हा रिया…

मुंबई | प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला आता जवळजवळ दीड महिना लोटला आहे. मात्र अजूनही सुशांतच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या दोषींचा पत्ता लागलेला नाही. मात्र आत्ता सुशांतची गर्लफ्रेंड रिया आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिच्याविरूद्ध आता अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. अशातच सुशांतच्या बॉडीगार्डने एका खाजगी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे.

सुशांतला जाऊन 40 दिवसांनी त्याच्या वडिलांनी रियावर जे आरोप केले आहेत मग त्यामध्ये काहीतरी तथ्य असणार असल्याचं सुशांतच्या बॉडीगार्डने म्हटलं आहे. सुशांतच्या आयुष्यात जेव्हा रिया मॅम आल्या तेव्हा सुशांत सरांचं पुर्ण लाईफ बदललं. इतर वेळी एनरझेटीक असणारे सर सारखे बेडवर पडून रहात होते. कहीवेळातर सुशांत सर त्यांच्या रूममध्ये बेशुद्ध अवस्थेत पडून असायचे तेव्हा रिया मॅम वरच्या मजल्यावर आपल्या आई, भाऊ आणि काही मित्र यांच्यासोबत पार्टी करायच्या, असंं सुशांतच्या बॉडीगार्डने सांगितलं.

2019 मध्ये सुशांत रियाला भेटला होता. त्यानंतर ते युरोप ट्रीपवर देखील गेले होते. तिथून परतल्यानंतर सुशांत सारखा आजारी पडत होता. त्याआधी सुशांत खूप सक्रीय होता. जिम, स्विमिंग, डान्स हे सर्व तो करायचा. मात्र त्यानंतर तो बेडवरच राहू लागला होता. सुशांतची औषध आणयला मी जेव्हा जायचो तेव्हा मला मेडिकलवाले मला विचारायचे हे औषध कोणासाठी आणि कोणी मागवली आहेत. तेव्हा मनात यायचं की औषधांमुळे सर पडून रहात असावेत, असंही बॉडीगार्डने सांगितलं.

दरम्यान, रियाने म‌ॅनने सुशांतचा सर्व जुना स्टाफ बदलला होता. केवळ मीच शिल्लक राहिलो होतो जो त्यांच्याजवळ असायचो.

महत्वाच्या बातम्या-

खळबळजनक! भाजपचे 40 आमदार माझ्या संपर्कात; बच्चू कडूंचा गौप्यस्फोट

“अमित शहांच्या डोक्यात दिवसरात्र सरकार पाडण्याचा विचार असतो”

झोपेत असलेल्या तरुणाच्या पॅंटमध्ये कोब्रा नाग शिरला अन्…

‘वडील रुग्णालयात भर्ती, आता कोणच्या जीवावर खाणार’; अभिषेक बच्चनने हेटर्सना दिलं हे सणसणीत उत्तर!

धक्कादायक! पत्नीसह नातेवाईकावर कोयत्याने सपासप वार करत दोघांना संपवलं