48 तासात संजय राऊत यांनी माफी मागावी अन्यथा…; सुशांतच्या भावाची राऊतांना नोटीस

मुंबई | अभिनेता सुशांत सिंहच्याआत्महत्येवरून सध्या अनेक आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. महाराष्ट्र पोलिसांवर बिहाप पोलीस सुशांतच्या तपासात कोणतीही मदत न केल्याचा आरोप करत आहे तर विरोधक राज्य सरकारवर आरोप करत आहेत. अशातच मध्यंतरी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुशांतचे वडील के. के. सिंह यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं. त्यावरून राऊतांना सुशांतच्या भावाने 48 तासात माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केलं असून त्यांचं दुसरं लग्न सुशांतला मान्य नव्हतं, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर सुशांतचा चुलत भाऊ नीरज  कुमारने संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

संजय राऊत यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये असं म्हटलं आहे की, राईत यांनी 48 तासात माफी मागावी अन्यथा त्यांना कायदेशार कारवाईला सामोर जावं लागेल.  दरम्यान राऊतांनी सामनाच्या अग्रलेखात, सुशांत आपल्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नामुळे खूश नव्हता. सुशांत सिंह राजपूत किती वेळा आपल्या वडिलांची भेट घेण्यासाठी पाटण्याला गेला होता? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.

संजय राऊतांची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळेसंजय राऊत माफी मागतात का?, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘सुशांतला हॉटेलमध्ये दिसलं होतं भूत…’; रियाने पोलिसांना सांगितली ‘त्या’ दिवशीची हॉटेलमधील कहानी!

“…म्हणून उद्धव ठाकरे, तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल”

मराठमोळे दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती गंभीर, चाहते चिंताग्रस्त

बॉलिवूडमधून धक्कादायक बातमी; संजू बाबूला कोरोना नाही पण झालाय ‘हा’ गंभीर आजार

सुशांतचे पोस्टमोर्टम रिपोर्ट आम्हाला दिले नाहीत…; बिहार सरकारचे मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप