मनोरंजन

गुन्हा दाखल झाल्यानंतर रिया चक्रवतीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली…

मुंबई | प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येप्रकरणी सुशांतच्या वडिलांनी सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल करत तिच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. त्यामुळे रिया आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अशातच तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

माझा देवावर आणि आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. मला न्याय नक्कीच मिळेल. माझ्याबद्दल इलेट्रॉनिक मीडियामध्ये अनेक विचित्र गोष्टी बोलल्या जात आहेत. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मी त्यावर बोलणार नाही. सत्याचा विजय होईल, असं रियाने म्हटलं आहे.

सुशांत सिंहच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीमध्ये रिया चक्रवर्तीवर, पैसे उकळल्याचा आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. मात्र सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आता सक्तवसुली संचालनालय (ईडी) तपास करणार आहे. याप्रकरणी ईडीने इन्फोर्समेंट केस रिपोर्ट नोंदवला आहे.

दरम्यान,  ईडी आता सुशांतच्या बँक खात्याशी संबंधित आर्थिक देवाणघेवाणीची चौकशी करणार आहे. सुशांतचे बँक खात्याचे सर्व डिटेल्स तपासले जातील. आर्थिक व्यवहार काय आणि कसे झाले, याची चौकशी होणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर आज सेवानिवृत्त; मला सुद्धा अनेक आजार आहेत पण मी…

घरात सोनं ठेवताय? आता सरकारला द्यावी लागू शकते घरातील सोन्याची माहिती

कोरोना पॉझिटिव्ह आईने दिला दोन जुळ्या बाळांना जन्म; बाळांचे रिपोर्ट आले…

भाजपला झाली लगीनघाई पण जोडीदारीण मिळेना, उद्यापासून लॉकडाऊन तोडा- प्रकाश आंबेडकर

कोरोनाच्या कृपेने 33 वर्ष परीक्षा देणारा विद्यार्थी अखेर झाला मॅट्रीक पास!