सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी रियाबाबत नवा खुलासा; पोलिसांच्या हाती लागले ‘हे’ पुरावे

मुंबई | अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न बाकी राहिले. या प्रकरणी अनेकांची चौकशी सुरु आहे. पोलिसांना याबाबत आणखी महत्वाची माहिती मिळाली आहे.

पोलिसांना सुशांतची बँकेबाबत माहिती हाती लागली आहे. पोलिसांच्या हाती लागलेल्या बँकेच्या 11 महिन्यांच्या डिटेल्सनुसार सुशांत सिंह राजपूतची कथित गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांतच्या क्रेडिट कार्डवरून खरेदी केली होती. एवढंच नव्हे तर गेल्या वर्षीच्या युरोप टूरचा खर्चही सुशांतच्या बँक अकाउंटमधूनच झाला होता. पोलिसांना मिळालेल्या या माहितीवरुन आता या प्रकरणी आणखी चर्चा रंगू लागल्या आहेत.

रिया चक्रवर्तीला गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. गुरुवारी तिने सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी अशी देखील मागणी केली होती. त्यानंतरही रियाला ट्रोल करण्यात आलं होतं. 14 जूनला सुशांतने मुंबईतील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

विजय मल्ल्याची सर्वोच्च न्यायालयात धाव; 13 हजार कोटी परतफेड करण्याची तयारी!

बापाचं संतापजनक कृत्य; बाळंतीण लेकीनं उचललं हे धक्कादायक पाऊल

महाविकास आघाडीतल्या ‘त्या’ वाद शिवसेनेकडून दिलगीरी; बाळासाहेबांचं स्पष्टीकरण

सख्या भावांनी घरातील सात जणांची तलवारीने केली निर्घृण हत्या; संपुर्ण जिल्हा हादरला!

लॉकडाऊनवरुन राजकीय मतभेद; जिल्हाध्यक्षांचा तटकरेंवर नाव न घेता गंभीर आरोप