मनोरंजन

सुशांतच्या आत्महत्येच्या रात्री सुशांतसोबत असणाऱ्या मित्राने सांगितली ‘त्या’ रात्रीची कहानी; म्हणाला…

मुंबई | अभिनेता सुशांत सिहं राजपूतच्या आत्महत्येला आता जवळजवळ दीड महिना लोटला आहे. मात्र अद्यापही सुशांतच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या दोषींची नाव समजू शकलेली नाहीत. अशातच सुशांतने ज्या दिवशी गळफास घेत आत्महत्या केली त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या मित्राने त्या दिवशी काय घडलं? याची माहिती दिली आहे.

सिद्धार्थ पिठानी असं सुशांतच्या मित्राचं नाव आहे. सुशांत त्या दिवशीच शांत दिसत होता. रात्रीच जेवण केल्यानंतर आम्ही सर्वजण झोपायला आतमध्ये गेलो होतो. मात्र का माहित त्या दिवशी मला झोप येत नव्हती आणि अचानक सुशांत माझ्या रूममध्ये आला.

सुशांत आला तेव्हा रात्रीचे 1 वाजले होते. त्याने मला विचारलं की कारे झोपला नाहीस. पण त्यावेळी मीच सुशांतला त्याच्या रूममध्ये सोडायला गेलो. त्याला सोडून मी माझा झोपलो. सकाळी माझ्या रूममध्ये घरकाम करणारा मुलगा आला आणि मला म्हणाला की सुशांत आपल्या रूमचा दरवाजा खोलत नाही. त्यानंतर मी माझ्या मित्रांना बोलावून घेतलं आणि दरवाजा उघडला, असं सिद्धार्थ म्हणाला.

दरम्यान, दरवाजा उघडल्यावर सर्व प्रकार पाहून वाटलं ही नव्हतं की सुशांत असं काही करणार आहे. सुशांत आणि रिया रिलेशनशिपमध्ये आहेत मला माहित होतं. परंतू याबद्दल तो मला कधीच काही बोलला नसल्याचं सिद्धार्थने सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

…त्यामुळे सदाभाऊ पिसाळल्यासारखं करत आहेत; राजू शेट्टींचं जोरदार प्रत्युत्तर!

‘राजू शेट्टी म्हणजे गावात सोडलेला वळू’; सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली

आनंदची यशोगाथा! ज्या इयत्तेत झाला होता नापास त्याच इयत्तेच्या पाठ्यपुस्तकात आज त्याचा धडा

जन्मदात्याचं ‘ते’ वाक्य जिव्हारी लागल्याने आठवीत शिकणाऱ्या मुलीने संपवलं आपलं आयुष्य!

….म्हणून बायकोने रात्री झोपेत असताना नवऱ्याच्या तोंडावर केले सपासप वार; कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण!