सुशांतच्या बहिणीने शेअर केली ‘ती’ शेवटची पोस्ट, म्हणाली….

मुंबई| अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अचानक झालेल्या मृत्युने देशभरात खळबळ माजवली होती. मुंबई आणि बिहार पोलिसांनंतर सीबीआय, ईडी आणि एनसीबी सारख्या देशातील उच्च दर्जाच्या शोध एजन्सीजने याप्रकरणी तपास सुरु केला होता.

सुशांत प्रकरणाला आत्तापर्यंत अनेक वेगवेगळी वळणं मिळाली आहेत. सुशांतच्या मृत्यूला जवळजवळ दहा महिने होतं आले आहेत. तरीसुद्धा तिच्या कुटुंबियांचं दुःख तीळमात्रही कमी झालेलं नाही.

सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्तीने आता आपल्या भावाची शेवटची पोस्ट शेअर केली असून, यासह तिने आपली व्यथादेखील व्यक्त केली आहे. श्वेताने सुशांतच्या शेवटच्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यात सुशांतने त्याच्या आईबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे.

भाऊ सुशांत सिंह राजपूतची आठवण काढत श्वेता सिंह किर्ती म्हणाली, “भावाची शेवटची पोस्ट…तुला यापुढे कधी बघता येणार नाही हा विचार करूनच खूप त्रास होतोय…हे दुःख तुकड्यांमध्ये कसं आपल्याला विखरु शकतं… आपण या तुकड्यांना एकत्र करायला जावू, जमा करालया जावू, तेव्हा आपल्याला कळतं की हे शक्य नाही…”

श्वेताची ही पोस्ट पाहून, चाहतेसुद्धा भावूक झाले आहेत. या पोस्टद्वारे चाहते कमेंट करून सुशांतचं आठवणींना उजाळा देतं आहेत. आणि त्याच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करत आहेत.

सुशांतने त्याच्या मृत्यूच्या एक आठवड्यापुर्वीच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आईसोबतचा एक फोटो कोलाज करुन शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने ‘माँ’ असं लिहिलं होतं. या फोटोला कॅप्शन देताना त्याने लिहिले की, ‘भूतकाळाच्या आठवणी अंश्रूवाटे वाहत आहेत. अपूर्ण स्वप्न आणि उद्याची आशा या दोघांमध्ये आयुष्य वाटाघाटी करत आहे. #आई’

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या जीवनावर आधरित ‘न्याय’ हा चित्रपट खूपच चर्चेत आहे. दिल्ली उच्च न्यायालयात सुशांतचे वडील केके सिंग यांनी चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात केवळ चित्रपटाचे शीर्षकच बदलले नाही, तर निर्मात्यांनीही सुशांतच्या जीवनाची कहाणी सांगितली आहे. या चित्रपटाचे नवीन शीर्षक आता ‘शशांक’ असे करण्यात आले आहे.

दरम्यान, 14 जून रोजी सुशांतने आपल्या राहत्या घरी ग.ळफा.स घेत आ.त्मह.त्या केली होती. सुशांतच्या अचानक झालेल्या मृ.त्युनं संपूर्ण देशात खळबळ घातली होती. सुशांत प्रकरणामुळे बॉलीवूडमध्ये पड.द्याआ.ड घडणाऱ्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

 

महत्वाच्या बातम्या – 

‘ब्रिटीश हवे होते अजून काही वर्ष…..’…

आणखी एका बाॅलिवूड अभिनेत्रीला कोरोनाची लागण, म्हणाली….

‘कोरोनाने माझा धडधाकट मित्र 15 दिवसांत…

जाणून घ्या! ऑस्कर जिंकणाऱ्याला किती रुपयांचं मानधन मिळतं

‘हा’ व्हिडीओ बघून तुमच्याही अंगाचा होईल थरकाप, त्यामुळे…