“केंद्र सरकारनं ‘रामायण’ सुरु केलं, तसं राज्य सरकारनं ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ सुरु करावी”

मुंबई |  कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे नागरिकांचं घरबसल्या मनोरंजन व्हावं, यासाठी केंद्र सरकारने गाजलेली रामायण मालिका सुरू केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने स्वराज्यरक्षक संभाजी मालिका सुरू करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली आहे.

संचारबंदीच्या काळात स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका राज्य सरकारने झी मराठी वाहिनीशी बोलून चालू करावी. अथवा सह्याद्री वाहिनी वर प्रसारित करावी, अशी मागणी तुपकर यांनी केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा खराखुरा इतिहास नवीन पिढीसमोर येणे गरजेचे आहे. आपले राजे किती कर्तृत्ववान होते. त्यांचे विचार व संस्कार नवीन पिढीवर होणे गरजेचे आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

रविकांत तुपकर यांनी यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी महाराष्ट्राच्या मनामनावर ठसलेली लोकप्रिय स्वराज्यरक्षक संभाजी मालिका सुरू करण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी वाहिनीशी बोलावं, असं म्हटलं आहे.

दरम्यान, आजपासून केंद्र सरकारने लोकांच्या खास आग्रहास्तव रामायण आणि महाभारत मालिका सुरू केल्या आहेत. डी डी नॅशनल या वाहिनीवर आज सकाळी 9 वाजता रामायणाचा भाग प्रसारित झाला आहे. तर दुसरा भाग रात्री 9 वाजता प्रसारित होणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या –

-गृहमंत्री अमित शहांना कोरोनाची लागण? पाहा काय आहे सत्य…

-विदेशी खेळाडूंची भरघोस मदत… कोहलीची 688 कोटीची संपत्ती मात्र मदतीचा हात आखडता!

-उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत खाकी वर्दीवर हात; अजित पवार काय कारवाई करणार याकडे लक्ष

-पोलीसदेखील एक माणूस आहे, त्यांच्यावर किती ताण देणार- जयंत पाटील

-कॉरंन्टाईनचा शिक्का असताना फिरत होता; शासनाने हुकलेल्या कलेक्टरला केलं निलंबित!