Loading...
महाराष्ट्र मुंबई

मी नाराज नाही; मी माझे मुद्दे मुख्यमंत्र्याकडे मांडले आहेत- तानाजी सावंत

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज सह्याद्री अतिथी गृहावर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी शिवसेना आमदार आणि पदाधिकारी सह्याद्रीवर येण्यास सुरुवात झाली आहे. या बैठकीत माजी मंत्री तानाजी सावंतही उपस्थित राहिले आहेत.

सह्याद्री अतिथीगृहावर शिवसेना आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना आमदारांशी चर्चा करणार असल्याचं कळतंय.

Loading...

मी नाराज नाही. पूर्णपणे पक्षासोबत आहे. माझे मुद्दे मी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखांकडे मांडले आहेत. त्यावर निराकरण होईल, असं तानाजी सावंत यांनी सांगितलं.

दरम्यान, तानाजी सावंत बैठकीला उपस्थित राहिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मंत्रिपद न मिळाल्यामुळे तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-हिंदूस्थानची अवस्था पाकिस्तानसारखी झाली नाही, ते फक्त गांधी, नेहरु आणि पटेलांमुळेच- संजय राऊत

-महात्मा गांधींच्या तोडीचा नेता स्वातंत्र्य चळवळीत झाला नाही म्हणूनच…- संजय राऊत

-“चांगल्या कार्यक्रमासाठी माझ्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या कुणी वापरत असेल तर माझी हरकत नाही”

-‘हिंदूहृदयसम्राटांचा छावा’ मनसे कार्यकर्त्याकडून राज ठाकरेंना नवी उपाधी

-मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक शिवस्मारकाचं काम थांबवलं; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर आरोप

Loading...