महाराष्ट्र मुंबई

“शिवसेनेने माझ्या आमदारकीचा राजीनामा घेतला, तर मी शिपाई म्हणून काम करेन”

मुंबई | शिवसेना पक्षाने माझ्या आमदारकीचा राजीनामा घेतला, तर मी शिपाई म्हणून काम करेन, पण पद सोडताना माझी एकच अट असेल, माझ्या भागाला 21 टीएमसी पाणी द्या, असं वक्तव्य शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी केलं आहे.

पाण्याच्या बाबतीत माझ्या जिल्ह्यावर अन्याय केला तर तो हाणून पाडेन. मग कुठला पक्ष याचा मुलाहिजा बाळगणार नाही, असा इशाराही तानाजी सावंत यांनी दिला. कुठल्या पक्षाची मराठवाड्याप्रती काय भूमिका आहे, हे दोन-चार महिन्यात स्पष्ट होईल, असंही तानाजी सावंत यांना म्हटलं आहे.

Loading...

पाण्याच्या बाबतीत त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर मराठवाडा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. गेली 50 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसने अन्याय केला. आमच्या शासनाने जी वॉटरग्रीड सिस्टम मंजूर केली होती, त्याला राष्ट्रवादीच्या नेत्याने स्थगिती देण्याचं कारस्थान केलं, असा आरोप तानाजी सावंत यांनी केला आहे.

दरम्यान, आपल्याला मंत्रिपद दिलं नाही, त्यामुळे विकास होईल का, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. पण विकासाच्या आड कोणी आलं, तर आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला तरी तानाजी सावंत मागेपुढे पाहणार नसल्याचं सावंत यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-शाहीन बाग आंदोलनादरम्यान फुलल्या प्रेमाच्या कळ्या; दोन जोड्या करतायत लग्न

-शाहीन बाग आंदोलनादरम्यान फुलल्या प्रेमाच्या कळ्या; दोन जोड्या करतायत लग्न

-बॅकफूटला गेलेल्या भाजपला अखेर गुड न्यूज!

-मुंबई भाजपमध्ये अध्यक्ष हटवण्याच्या जोरदार हालचाली; या नेत्यांची नावे चर्चेत

-दिल्लीप्रमाणे आता महाराष्ट्रातही मोफत वीज!