‘महाभारत’मधील इंद्राची भूमिका साकारणाऱ्या ‘या’ अभिनेत्याचं कोरोनामुळं निधन

मुंबई| अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमार यांच्यासोबत काम केलेले प्रसिद्ध अभिनेते सतीश कौल यांचं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून सतीश कौल यांची प्रकृती खालावली होती. त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली. कोरोनाची लागण झाल्याने त्यांची प्रकृती आणखी खालावली. 10 एप्रिलला त्यांची प्राणज्योत मालवली. ते 74 वर्षांचे होते.

अशोक पंडित यांनी एक ट्विट करत सतीश यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अशोक पंडित यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं- ‘हिंदी आणि पंजाबी सिनेमांतील प्रसिद्ध अभिनेते सतीश कौल यांच्या निधनाबद्दल कळलं. फार वाईट वाटलं. करोनामुळे त्यांचं निधन झालं. ते गेल्या काही काळापासून आजारी होतो. त्याच्या कुटुंबियांना आणि परिजनानां सहानुभूती ओम शांती.’

सतीश कौल यांनी ‘महाभारत’ या लोकप्रिय मालिकेत इंद्राची भूमिका साकारली होती. हिंदी आणि पंजाबी चित्रपटांसह त्यांनी सुमारे 300 चित्रपटांत काम केले. ‘महाभारत’, ‘सर्कस’ आणि ‘विक्रम बेताल’ यासारख्या लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमांमध्ये काम करूनही 74 वर्षीय सतीश कौल यांचे आयुष्य आजारपण आणि हालाखीत जात होते.

गेल्या वर्षी त्याने सोशल मीडियावर आर्थिक मदत मागितली होती. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे त्याची प्रकृती आणखी बिकट झाली. सतीशकडे जितके पैसे होते, ते एका व्यवसायात बुडले.

“औषधं, भाजी आणि काही मुलभूत गोष्टींसाठी मी झगडत आहे. मला मदत करा.अभिनेता असताना माझ्यावर इतक्या जणांनी प्रेम केलं. पण आता मला एक माणूस म्हणून मदतीची गरज आहे,” असं म्हणत सतीश यांनी मदतीची याचना केली होती.

लुधियाना येथील एका छोट्या घरात राहणारे सतीश कौल यांनी गेल्या वर्षी एका मुलाखतीत सांगितले होते की, दरमहा भाड्यासाठी 7500 रुपये द्यावे लागतात व औषधांच्या खर्चासाठीही त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. लॉकडाऊनमुळे त्यांच्याकडे पैसेदेखील नव्हते.

आपण अभिनय करत असताना लोकांनी जे प्रेम दिलं त्याचा फार अभिमान वाटतो असं सांगताना आपल्याला सध्या कोणतीही तक्रार नसल्याचंही ते म्हणाले होते. “जर लोक मला विसरले असतील तर ठीक आहे. मला खूप प्रेम मिळालं असून त्यासाठी मी आभारी आहे. मी सदैव त्यांचा ऋणी राहीन. मी राहू शकेन असं व्यवस्थित घर विकत घेण्यासाठी मी सक्षम व्हावं एवढीच अपेक्षा आहे. मी अजूनही जिवंत आहे आणि सगळं काही संपलेलं नाही. मला कोणीतरी काम द्यावं अशी अपेक्षा आहे. मला पुन्हा अभिनय करायचा आहे,” अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.

2011 मध्ये त्यांनी मुंबई सोडली आणि पंजाबमध्ये राहायला गेले आणि तेथे एक अभिनय शाळा उघडली. मात्र 2015 मध्ये पाठीचं हाड मोडल्याने जे काम सुरु होतं ते थांबवावं लागलं. दोन वर्ष ते रुग्णालयात होते. नंतर त्यांना वृद्धाश्रमात जावं लागलं. तिथे ते दोन वर्ष राहिले.

दरम्यान, ‘महाभारत’ मालिकेबरोबरच ‘आंटी नंबर 1’, ‘कर्मा’, ‘जंजीर’, ‘खेल’, ‘राम लखन’, ‘खुनी महल’ यांसारखे सुपरहिट चित्रपटांमधून त्यांनी काम केले होते. एकेकाळी कोट्यावधीची संपत्ती असणारे सतीश कौल आज हलाखीचे जीवन जगत होतो. चित्रपटांमधून मिळालेल्या संपत्तीतून त्यांनी अभिनय शाळा सुरु केली होती. मात्र ती नीट चालली नाही. यामुळे त्यांच्याजवळ असलेला सगळा पैसा संपला. त्यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगा देखील त्यांना सोडून अमेरिकेत स्थायिक झाले होते.

 

महत्वाच्या बातम्या – 

बिहारमधील फरार आरोपीच्या घरी बँड बाजासह पोहचली पोलीस; पाहा…

ट्विटरवरील वादानंतरही तापसीनं कंगनाचे मानले आभार, म्हणाली….

चोर गाडी चोरायला आला अन् 82 वर्षीय आजोबांनी त्याला चांगलाचा…

बोंबला! गूगल मॅपमुळे दुसऱ्याच्याच लग्नात पोहचला नवरदेव अन्…; पाहा व्हिडीओ

या महिलेला रस्त्यात असं काही दिसलं की ती पळत गेली अन्…; व्हिडीओ व्हायरल