कॅप्टन एका ठिकाणीच बसलेत, अन् मी मात्र फिरतोय- शरद पवार

औरंगाबाद | महाराष्ट्रात वाढत जाणारा कोरोनाबाधितांचा आकडा अत्यंत चिंताजनक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहेत. औरंगाबादमध्ये कोरोनाचा वाढलेला मृत्यूदर आणि प्रशासनाच्या उपाययोजना जाणून घेण्यासाठी शरद पवार यांनी पालकमंत्री सुभाष देसाई आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी बैठक घेतली.

बैठकीदरम्यान इशारेवजा स्पष्टीकरण देताना पवार म्हणाले, “कोरोनाकाळात खासगी डॉक्टरांना सहकार्य करावेच लागेल. शासकीय यंत्रणेने त्यांच्या सेवेची मागणी केली तर त्यांना सेवा द्यावीच लागेल. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार महामारीत वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना समन्स देण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. मात्र, अद्याप तशी वेळ आली नाही.”

बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलताना पवार म्हणाले,” सध्या संपूर्ण राज्यावर कोरोनाचे संकट आहे. जर मुख्यमंत्री एखाद्या जिल्ह्यात जाऊन बसले तर बाकीच्या जिल्ह्यांच्या समस्यांवर तातडीने निर्णय घेणे अवघड होईल. त्यामुळे कॅप्टन एका ठिकाणी बसून आहेत व बाकी टीम काम करत आहे की नाही यावर नियंत्रण ठेवत आहेत. मी सतत लोकांच्यात राहणारा माणूस आहे. मला एका ठिकाणी बसवत नाही म्हणून मी फिल्डवर आहे.”

दरम्यान, शरद पवार सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या आकड्याबाबत चिंता व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोनानं त्यांचं आयुष्यच बदललं!; देहव्यापार सोडून सुरु केलं ‘हे’ काम

आता मुख्यमंत्र्यांनाच झाली कोरोनाची लागण; म्हणाले, संपर्कात आलेल्यांनी चाचणी करुन घ्या!

कोरोनाचे भयानक वास्तव! नोकरी सुटल्याने बापाने पोटच्या मुलाला विकलं!

“कोरोना झालेल्या रुग्णांना पुण्यात कोणी बेड देतं का बेड?”

…म्हणून अमिताभ बच्चन यांनी जोडले हात; म्हणाले, “देवा माझी मदत कर!