“फिल्म इंडस्ट्री नेहमी सत्ताधाऱ्यांच्या सोबत राहिलेली आहे”

नवी दिल्ली | सीएए-एनआरसी-एनपीआरविरोधात सुरू असलेलं आंदोलन, जातीयवादाचा उदय आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवरील चित्रपटसृष्टीतील बड्या नावांचं मौन यासह विविध विषयांवर ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी द वायरशी संवाद साधला. यावेळी फिल्म इंडस्ट्री नेहमी सत्ताधाऱ्यांच्या सोबत राहिलेली आहे, असं रोखठोक मत त्यांनी मांडलं आहे.

सीएए आणि एनआरसीविरोधातल्या आंदोलनावर बोलताना शाह म्हणाले-

तरुण अचानक जागृत झाला आणि खडबडून जागं झाल्यावर त्याला समजले की तो चिरडला जात आहे. आज मी वृत्तपत्रात वाचत होतो की शैक्षणिक अर्थसंकल्पात 30 हजार कोटी रुपयांची कपात झाली आहे आणि आम्ही ते पुन्हा एनआरसी-सीएए अंमलबजावणी तसंच त्या प्रक्रियांवर खर्च करीत आहोत. असं जर होत असेल तर देशातील युवा वर्ग कसा काय शांत बसेल??

सीएएमधील पहिला दोष आपण पाहतो की त्यातून मुस्लिम वगळले गेले आहेत. हे आश्चर्यकारक नाही, परंतु केंद्र सरकारने असे उघडपणे करावे अशी मला अपेक्षा नव्हती, असंही शाह म्हणाले.

सीएए किंवा एनआरसीला विरोध केवळ मुस्लिमच करत नाहीत तर आसाममधील लोक वेगवेगळ्या कारणांसाठी निषेध करत विरोध करत आहेत. हिंदी पट्ट्यात त्याच्या निषेधाचं कारण वेगळे आहे. मी देखील फक्त एक मुस्लिम म्हणून हे सांगत नाही तर या देशाचा जबाबदार नागरिक म्हणून बोलत असल्याचं नसिरूद्धीन शाह म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-आयपीएल सुरू झाली रे…. असं असेल वेळापत्रक!

-व्होडाफोन भारतातला आपला गाशा गुंडाळणार?

-“दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांना विरोध करणं हे तर भाजपच्या DNA मध्ये”

-भीमा कोरेगावचा तपास NIA कडे देऊन एक पाऊल मागे घेतलेलं ठाकरे सरकार मोदींना ‘असा’ देणार शह?

-रामलीला मैदानावर आज आवाज घुमणार, मैं अरविंद केजरीवाल…..शपथ लेता हूँ की