मुंबई महापालिकेने दंड वाढवल्यावरही थुंकोबांकडून एका दिवसात तब्बल इतका दंड वसूल

मुंबई | काेरानाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर थुंकल्यास मुंबई महापालिकेने 1 हजार रूपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र तरीही थुंकोबांची सवय काही गेली नाही आणि काल मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईत थुंकोबांना आपला खिसा खाली करावा लागला.

काल मुंबई महापालिकेने दंड वाढवल्यानंतर एका दिवसात 111 जणांवर कारवाई करत 46 जणांना सावधान केलं म्हणजेच वारनिंग दिली. तर 111 जणांकडून तब्बल 1 लाख 11 हजार रूपये इतका दंड वसूल करण्यात आला.

आता प्रत्येक तासाला थुंकोबांची संख्या मोजण्यात येणार असून त्या आकड्याचं प्रमाण कमी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास याआधी 200 रूपये इतका दंंड आकारण्यात येत होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच पटीने हा दंड वाढवण्यात आला असला तरीही मात्र थुंकोबांना काही त्याचं गांभीर्य नसल्याचं यातून दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-धक्कादायक! कोरोनामुळे इटलीत एका दिवसात 475 जणांचा मृत्यू

-कोरोनापासून वाचण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी जनतेला केलं ‘हे’ आवाहन

-कोरोनामुळे पुण्यातील 584 पीएमपीएमएलच्या फेऱ्या बंद

-“आम्ही पण भारतीय, आम्हाला कोरोना म्हणणं बंद करा”; पाहा व्हिडीओ

-डोनाल्ड ट्रम्प कोरोनाला म्हणाले ‘चिनी व्हायरस’; संतापलेल्या चीननं केली कारवाई