गेहलोत सरकारने ‘गोळवळकर’ ग्रामीण विकास योजनेचं नाव बदलून केलं ‘गांधींजी!’

जयपूर | राजस्थान सरकारने सरकारी योजनांमधून संघ आणि भाजपशी संबंधित नेत्यांची नावे हटवण्याची प्रक्रिया सुरूच ठेवली आहे. राजस्थानच्या ग्रामीण विकासासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी राबविल्या जाणाऱ्या गुरु गोळवलकर ग्रामीण जन भागीदारी योजनेचे नाव आता महात्मा गांधी ग्रामीण जन भागीदारी योजना असे करण्यात आले आहे.

या योजनेचं नाव बदलण्यासाठी राजस्थान सरकारच्या ग्रामीण व पंचायत विकास विभागाने आदेश जारी केले आहेत.
याशिवाय तत्कालिन भाजपच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी सुरू केलेली महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री जल स्वावलंबन योजनेचे नावही राजीव गांधी जल स्वावलंबन योजनेत बदलण्यात आले आहे. यानंतर मात्र आता राजकीय वादाला तोंड फुटलं आहे.

काँग्रेस सरकारने सरकारी योजनेच्या नावाखाली आरएसएसचे गुरू गोलवलकर यांचं नाव हटवल्याबद्दल भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्ही सत्तेत आल्यास आम्ही नावं बदलल्याशिवाय राहणार नाही, अस भाजप नेते गुलाबचंद कटारिया यांनी म्हटलंय.

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी राजस्थानच्या सरकारी शाळांमधून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तसबीरी हटवण्याचे आदेश गेहलोत सरकारने दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-मागणी तुम्ही केली तर चालते; अन् आम्ही केली तर मग त्यात बिघडलं कुठं?- राज ठाकरे

-पोरगी गेली पळून; अन् बापाने गावात पोस्टर लावून वाहिली श्रद्धांजली!

-शिवरायांवरच्या टिकटाॅक वरील या व्हीडिओने सोशल मीडियावर घातला चांगलाच धुमाकूळ!

-अजित पवारांनी दिला मुंबईच्या डबेवाल्यांना सुखद धक्का; देणार…

-मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ निर्णय चुकीचा; आघाडीत वादाच्या ठिणग्या